कोलवाळ येथील डॉक्टर आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘ लँग्वेज क्लबचे ‘ उद्घाटन.

.

कोलवाळ येथील डॉक्टर आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयात ‘ लँग्वेज क्लबचे उद्घाटन.

नाथ पै  मेमोरियल एज्युकेशन संस्थेच्या कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयात लँग्वेज क्लब चा उद्घाटन सोहळा राष्ट्रीय शिक्षा दिनाच्या शुभ दिवशी विद्यालयाच्या  ‘ विनायकराव सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोरगाव येथील कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री सुदन बर्वे व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय  विद्यालयाचे प्राचार्य श्री विठ्ठल पार्सेकर , नाथ पै  मेमोरियल संस्थेचच्या सदस्या सौ. वर्षा परब , लाँग्वेज क्लबचे कॉर्डिनेटर सौ. राजश्री पवार  ,श्री परशुराम नाईक  ,सौ.अंकिता देसाई ,श्री गोविंद पार्सेकर ,श्री संजय परब, श्री दशरथ रेपाल , श्री मनोहर गोवेकर ,सौ उज्वला आरोलकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुणे श्री सुदन बर्वे व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या शुभ करकमलाच्या हस्ते समई प्रज्वलित व मौलाना आझादच्या तस्विरीला हार घालून  ‘लँग्वेज क्लबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्य याने मान्यवरांचे स्वागत व  प्रास्ताविक भाषण  केले .सौ राजश्री पवार हिने ‘ लग्वेज क्लब ‘ व संक्षिप्त माहिती करून दिली .कुमारी मौसमी करापूरकर हिने पाहुण्यांची ओळख करून दिली उपस्थित सर्व मान्यवरांन पुष्प अर्पण केले.

विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास  म्हणजे बुद्धी, शरीर, ज्ञान याचा विकास , त्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने शालेय विषयाच्या अभ्यास क्रमाबरोबर त्यांना संस्कारीत व सक्षम करणे गरजेचे आहे . आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी स्पर्धा निर्माण झाली .त्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी , त्यात यशस्वी होण्यासाठी ,प्रत्येकाने व्यक्तीत्त्वबाबत सतर्क असणे गरजेचे आहे . असे उद्गार प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. याशिवाय श्री परशुराम नाईक ,सौ राजश्री पवार यांची सुद्धा अबल कलाम गुलाम मोहिउद्दिन अहमद वर समयोचित भाषणे झाली.

त्यानंतर कविता सादरीकरण कार्यक्रमाला सुरवात झाली. या कार्यक्रमात एकूण 15 विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात कविता गाऊन वाचून दाखविल्या. त्यात प्रामुख्याने कुमारी अर्चना देऊळकर, मौसमी कारापूरकर , रंजना मोपकर ,श्रुती परी आसवंती टॉपनो ,विशाखा हळडणकर , पवित्र हळडणकर , प्रीती गाव , दिया पार्सेकर ,नेबिदिता सिंग , सुलतान खान ,नंदिनी चव्हाण व प्रियांका बेनुर इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता . शिक्षकांमधून श्री परशुराम नाईक, सौ. राजश्री पवार ,स. वर्षा परब , सौ. अंकिता देसाई व प्राचार्य श्री विठ्ठल पार्सेकर आदींनी सुंदर आवाजात कविता गाऊन वाचून सादर केल्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अनिता डोंबार व कुमारी दिया पार्सेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमारी पवित्रा हळडणकर हिने केले .कविता सादरीकरण कार्यक्रम खूपच रंगतदार झाला .

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar