हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणार्‍या सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी आणा !*

.

दिनांक : 12.11.2021

*हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणार्‍या सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी आणा !*

*हिंदु आणि हिंदुत्व एकच; मुस्लिमप्रेमी काँग्रेसचा दोन्हीला विरोधच !*

भारत आणि भारतीयत्व, माता आणि मातृत्व यांत जसा भेद नाही, तसेच हिंदू आणि हिंदुत्व यांत भेद करताच येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि सलमान खुर्शीद यांनी ‘हिंदुइजम’ आणि हिंदुत्व वेगळे असल्याचे कितीही स्पष्टीकरण दिले, तरी हिंदू त्याला भूलणार नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांना हिंदु धर्माविषयी जरी खरे प्रेम असते, तर ‘भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण काल्पनिक आहेत’, भगव्या आतंकवादाचा देशाला धोका आहे, असे म्हणून काँग्रेसने हिंदु धर्माचा अवमान केला नसता ! तसेच काश्मीर आणि पाकिस्तान-बांग्लादेश येथील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला असता; मात्र हे काहीही न करता आता निवडणुकांमुळे हिंदु मतांकडे लक्ष ठेवून मंदिर-पर्यटनाला प्रारंभ केला आहे. त्यातच त्यांच्या नेत्यांकडून हिंदूंची ‘बोको-हराम’ आणि ‘आयसीस’च्या आतंकवाद्यांशी तुलना करून अपमानीत केले जात आहे. यावर मुलामा म्हणून मग हिंदुत्व आणि ‘हिंदुइजम’ यांत भेद असल्याच्या बाता मारल्या जात आहेत. याला हिंदु समाज आता भूलणार नाही, हे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे. त्यांचे जर खरेच हिंदू धर्मावर प्रेम असेल, तर सलमान खुर्शीद यांना त्यांचे पुस्तक मागे घेऊन हिंदू समाजाची माफी मागण्यास सांगावे. सरकारकडेही आमची मागणी आहे की, जर भारतात दा-विंची कोड, सॅटनिक व्हर्सेस या अन्यधर्मीयांच्या संदर्भातील पुस्तकांवर बंदी घातली जाऊ शकते, तर मग सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घातली गेली पाहिजे.

*काँग्रेसने इस्लाम आणि जिहादी आतंकवाद भिन्न असल्याचे बोलून दाखवावे !*

हिंदु आतंकवादाच्या संदर्भात बोलतांना हिंदुत्व आणि ‘हिंदुइजम’ यांत भेद असल्याचे सांगणारे काँग्रेसी नेते जगभर आतंकवादी कारवायांद्वारे सर्वांना त्रस्त करणार्‍या जिहादींविषयी कधी तोंडातून शब्द तरी काढतात का ? तेव्हा इस्लाम आणि जिहादी आतंकवाद भिन्न असल्याचे सांगून जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात ते का बोलत नाहीत ? त्या वेळी मात्र ‘आतंकवादाला धर्म नसतो, कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही’, असे सांगून मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुस्लिमप्रेमी काँग्रेसने प्रथम स्पष्टपणे जिहादी आतंकवादाच्या संदर्भात बोलून दाखवावे !

काही दिवसांपूर्वी त्रिपुरा राज्यात मुसलमानांवर झालेल्या कथित आक्रमणाविषयी लगेचच गळा काढणार्‍या काँग्रेसच्या राहूल गांधींनी नवरात्रीच्या कालावधीत बांगलादेशातील निरपराध हिंदूंवर झालेल्या अमानवी आक्रमणांविषयी चकार शब्द तरी काढला आहे का ? यातूनच काँग्रेसला हिंदूंच्या संदर्भात काही देणे-घेणे नसून, त्यांचे निवडणुकांपुरते जागृत झालेले हिंदु धर्माविषयीचे पुतना मावशीचे प्रेम दिसून येते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar