श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे अनावरण करताना संस्थेचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे

.

श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाने घेतलेली रौप्यमहोत्सवी झेप ही कार्यक्षम व्यवस्थापन,अध्यापनकुशल शिक्षकवर्ग,
अध्ययनरत विद्यार्थी व प्रभावी पालक-शिक्षक संघ यांच्या अविरत प्रयत्नांचे फलित आहे असे उद्गार पीर्ण ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे यांनी काढले.पीर्ण ग्रामसेवा मंडळ संचालित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे अनावरण संस्थेच्या संस्थापक दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थिताना संबोधित करताना तानावडे यानी केलेल्या वाटचालीवर आत्मसंतुष्ट न राहता,नव्या शैक्षणिक धोरणानुसार आत्मनिर्भर विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांनी अधिक कार्यरत राहण्याची गरज प्रतिपादन केली.याप्रसंगी व्यासपीठावर पीर्ण ग्रामसेवा मंडळाचे सचिव प्रकाश नाईक,पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ फडते, प्राचार्य उमेश नाईक ,मुख्याध्यापिका राजनिता सावंत व प्राध्यापक दत्ता परब हे मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून संपूर्ण वर्षभरात झालेल्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचा आढावा घेतला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्ता परब यांनी केले.संस्थेच्या संस्थापकदिनाचे औचित्य साधून प्रतिवार्षिक संपन्न होणाऱ्या श्री सत्यनारायण महापूजेच्या महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. कला शिक्षक वासुदेव शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली
विद्यार्थीवृदांने ‘स्वर भक्तीचे ‘हा बहारदार भक्तिसंगीतपर कार्यक्रम सादर केला. प्राध्यापिका रचना परब यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्री विश्वास नाईक व यशवंत साखळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar