अमृतपाणी (बुरशीनाशक ) कसे तयार करावे

.

अमृतपाणी (बुरशीनाशक ) कसे तयार करावे – 

अमृतपानी हे देशी गायीचे शेण, गोमुत्र व गुळ या द्रव्याच्या मिश्रणाने बनविलेले एक गुणकारी पाणी आहे. अमृतपाण्याचा उपयोग सर्व पिकांसाठी गुणकारी आहे. विशेष म्हणजे हे पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते व विषारी बुरशीचा नाश करते.

निर्माण विधि :-  वीस लिटर देशी गायीचे गोमुत्र, २० किलो शेण व २५० ग्राम गुळ मिश्रित करुन एखाद्या सीमेंटच्या टाकीत ते  एकजीव करावे.  हे मिश्रण ७-८ दिवस झाकून ठेवावे. एक दिवसाआड काडीने ३-४ वेळा ढवळावे.

उपयोग करण्याची विधि :- २०० लिटर पाण्यात १० लिटर अमृतपाणी घेऊन १ एकर शेतीसाठी पाण्यासोबत दयावे किंवा शिंपडावे.   अमृतपाणी हे ८-९ दिवसांत तयार होते.  तयार झाल्यावर ४ दिवसांत ते वापरावे.

 कीटनियंत्रक तयार करण्याची विधि :-  अडीच किलो कडुनिंबाची पाने व ६५ ग्राम लसुन कुटुन १० लिटर गाईच्या गोमूत्रात मिसळावे.   मिश्रण मातीच्या मडक्यात घेऊन मडके जमिनीत गाडावे व त्यावर झाकण ठेवावे.   २१ दिवसांनी मडके बाहेर काढावे. त्यातील पाने बाहेर काढावे व माठातील गोमुत्र तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याची वस्तु भांड्यात घेऊन उकळावे.  १/४ होईपर्यंत उकळावे.  थंड करुन त्याला गाळून पॅक करावे.

उपयोग करण्याची विधि :-

१ लिटर कीटक नियंत्रक  १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.    कीटनियंत्रक पेरणीपासून १५ -२० दिवसापर्यंत फवारु नये.  पीक काढणीच्या १ महिन्याअगोदर पासून फवारणी बंद करावी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें