किनारी भागात फोफावलेल्या अंमली पदार्थ व्यवसायावर नियंत्रण कोणाचे

.

म्हापसा   दि. 14  ( प्रतिनिधी )

       किनारी भागात फोफावलेल्या अंमली पदार्थ व्यवसायावर गोमंतकीय पाबलो एस्कोबार याचे नियंत्रण असून बार्देश तालुक्यातील सरकारात मंत्री असलेल्या पाबलो एस्कोबार यांची आपल्या मतदार संघात लुडबुड वाढलेली आहे  अंमली पदार्थ व्यवसाय वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या या पाबलो एस्कोबार याला एका आठवड्याच्या आत मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी आपली मुख्यमंत्र्याकडे मागणी असल्याचे शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
         म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की अंमली पदार्थाच्या या व्यवसायामुळे युवा पिढी बरबाद होत आहे. आमदार म्हणून निवडून आल्यावर आपण यावर आवाज उठवला होता त्यावेळी या पाबलो एस्कोबारने आपल्याला गप्प बसण्यास भाग पाडले होते, आता पुन्हा या व्यवसायाविरुद्ध आवाज उठवताना परिणामची पर्वा करीत नाही, भले आमदार नाही झालो तरी चालेल पण आपला या व्यवसायास विरोध असेल.
         आपण शिवोली मतदार संघाचा आमदार झाल्यानंतर आपण जेवढी विकासकामे केली तेवढी बाजूच्या मतदार संघात सुद्धा झालेली नाहीत, तिथल्या लोकप्रतिनिधी जो आपल्या पत्नीला निवडणुकीकरिता पुढे काढत आहे त्याला आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते. शिवोलीचा इतिहास आहे, येथील जनता स्थानिक वगळता बाहेरच्याला स्वीकारत नाही आणी या मतदार संघात भंडारी समाजाचे प्राबल्य असल्याने आतापर्यत एक अपवाद वगळता भंडारी समाजाचाच उमेदवार निवडून आला आहे. या मतदार संघात उपविजकेंद्र उभारले, भूमिगत विजवाहिन्यांचे जाळे घातले, बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या खराब रस्त्यांचे हॉटमिक्सींग डांबरीकरण केले. अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या 350 कोटीच्या तिळारी प्रकल्पला चालना देत तिलारीची वाहिनी आसगाव पर्यत आणली आता फक्त 30 एमएलडी चा पाणी प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, या करिता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपणास आश्वासन दिले आहे असे आमदार पालयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar