लोबो यांची श्रद्धा आणि सबुरी

.

म्हापसा  दि. 15  ( प्रतिनिधी )

       माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रेरणेने आपण 2005 मध्ये भारतीय जनता पक्षात गेलो होतो.त्यांच्या विचार धारेने आणी कार्यपद्धतीने भारावून गेल्यामुळेच आजपर्यंत भाजपात आहे, आणी त्यांचा तोच वारसा पुढे नेण्याचा आपला प्रयत्न आहे, प्रत्येकाकडे चुका होतातच तशी त्यांच्याकडूनही झाली होती पण त्यांनी नंतर जनतेकडे चूक मान्य केली म्हणून 1012 मध्ये सर्व धर्माच्या जनतेने त्यांना बहुमत दिले. आताही पुन्हा झालेल्या चुका मान्य करून निवडणूक लढवल्यास भाजपाला निश्चित 21 जागा मिळतील असा विश्वास घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी कांदोळी येथे व्यक्त केला.
        कांदोळी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आपण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी हे आपले समर्थक कार्यकर्ते व मतदार ठरवतील, मतदार संघातील लोकांशी बोलून 15 डिसें. नंतर आपणा निर्णय जाहीर करू. आपल्या विरोधात कोणी काही बोलत असेल तर सध्या आपण त्यावर काही भाष्य करणार नाही. निवडणुका जाहीर झाल्या की आपण प्रत्यूत्तर देऊ. शिवोलीचे आमदार आपले चांगले मित्र आहेत,  त्यांना निवडून आणण्यात आपला हात असल्याचे त्यांनीच यापूर्वी सांगितले आहे. काही कारणामुळे किंवा आपली पत्नी शिवोली मतदार संघातून निवडणूकीची तयारी करीत असल्याने कदाचित ते दुखावले असतील तर त्यांनी आपणास भेटून बोलावे, जर त्यांनी शिवोली मतदार संघात विकास कामे केली आहेत आणी पुढील निवडणुकीत त्यांनीच लढवावी असे जनतेने सांगितल्यास आपण डिलायला लोबो हिला माघार घ्यायला लावतो असे मंत्री लोबो यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar