किनारी भागांत लमाणी लोकांचा हैदोस

.

किनारी भागांत लमाणी लोकांचा हैदोस चालू असून स्थानिक किरकोळ विक्रेत्यांकडे दादागिरी करीत असल्याची प्रकरणे वाढत आहे.पर्यटकांची सतावणुक चालू असून ह्याला कारणीभूत पोलीस. आउटपोस्टचे पोलीस व अन्य पोलीस वर्ग हप्तेबाजीत गुंतले असल्याचा आरोप नागरिकांनी ग्रामसभेत केला आहे.त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, उपाययोजना निश्चित करू असे सरपंच मनोहर केरकर यांनी सांगितले.

दरम्यान दीड वर्षानंतर ग्रामसभा झाल्याने ग्रामस्थांत उत्साह होता, त्यापेक्षा पंचायतीने फेब्रुवारी 20 मध्ये झालेल्या ग्रामसभेतील ठरांवाची कार्यवाही न केल्याने नाराजी व्यक्त केली.प्रारंभी सचिव दशरथ परब यांनी मागील सभेचा अहवाल मांडला तर सरपंच मनोहर केरकर यांनी स्वागत केले.

किनारी भागांतील लमाणी व परप्रांतीय लोकांनी स्थानिक किरकोळ विक्रेत्यांशी दादागिरी व अरेरावी चालविली आहे त्याचा निषेध केला आहे.लमाणी लोकांच्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सर्वाधिकार देण्याची सूचना ग्रामस्थांनी केली.आऊटपोस्टचे पोलिस तसेच अन्यठिकाणी असलेले पोलिस लमाण्यांकडून हप्ते वसूल करण्यात जास्त रस दाखवीत आहेत तसेच स्थानिक विक्रेत्यांना हुसकावून लावण्याच्या खटपटी करीत असल्याचा आरोप सांतान फेर्नांडिस व ग्रामस्थांनी केला.त्याला अनुसरून पंचायतीने पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार द्यावेत असे नागरिकांनी सुचविले.
प्रमुख रस्ता ते खालचावाडा पर्यतच्या फुटपाथमुळे वाहतूक कोंडी तसेच अपघाताची संख्या वाढली असल्याने तो फुटपाथ हटवावा अशी सूचना नागरिक उदय वायंगणकर यांनी केली असता,नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे हैसाठी फुटपाथ बांधल्याचे टोनी डिमेलो यांनी सांगितले, तो काढून टाकण्यासाठी वैयक्तिक स्तरांवर प्रयत्न करावेत अशी सूचना पंच इनासियो डिसौझा यांनी केली व ठराव दाखल करून घेण्यात असमर्थता दाखविली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar