ग्रामस्थाना विश्वासात घ्या,नंतरच प्रकल्पांना परवानगी—
नानु रिसॉर्टसला गांवातील समस्यांचे निराकरण न करता परवाना देण्यात आला. त्यात वीज खाते,पाणी पुरवठा खाते,नगरनियोजन खाते व अन्य खात्याने परवानगी दिल्याने पंचायतीला परवानगी द्यावी लागल्याचे सरपंचांनी सांगितले.मात्र आगामी काळात अन्य प्रकल्पाच्या बाबतीत ग्रामसभेला विश्वासात घ्यावे व परवानगी द्यावी अशी मागणी टोनी डिमेलो यांनी केली.नानु रिसोर्टने पंचायतीची नोटीस धुडकावली तसेच रस्ता विभागाला मूर्खात काढले,परंतु अजूनही सरकारी जमीन बळकवलेल्या पेव्हर्स तश्याच आहेत असा सवाल नागरिकांनी केला.त्यासाठी पुन्हा पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन सरपंच केरकर यानी दिले.
नानु रिसॉर्टसला गांवातील समस्यांचे निराकरण न करता परवाना देण्यात आला
.
[ays_slider id=1]