गोवा सरकारच्या गृह खात्याने नोकरभरती प्रक्रियेत कॉन्स्टेबल, पोलीस उपनिरीक्षक व अन्य पदासाठी मुलाखती व शारीरिक चाचणी पुढील महिन्यात

.

गोवा सरकारच्या गृह खात्याने नोकरभरती प्रक्रियेत कॉन्स्टेबल, पोलीस उपनिरीक्षक व अन्य पदासाठी मुलाखती व शारीरिक चाचणी पुढील महिन्यात होणार आहे.त्या अनुषंगाने हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या पार्सेकर कॉलेजमध्ये लेखी परीक्षेची पूर्वतयारी प्रशिक्षण वर्ग सुरू केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.

ह्या पूर्वतयारी प्रशिक्षण वर्गाच्या युवा मार्गदर्शन कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पार्सेकर बोलत होते.गोवा शासनात अंदाजे 800 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पुढील महिन्यात लेखि परिक्षा होणार आहे.कॉन्स्टेबल व उपनिरीक्षक पदांसाठी शारीरिक चाचणीच्या परीक्षा झाल्या आहेत.त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार समप्रमाणात उत्तीर्ण झाले आहेत.शारीरिक चाचणी परीक्षेत फक्त उत्तीर्ण ग्राह्य असते, सर्वप्रथम असा भाग नसतो.परंतु, लेखी परीक्षेतील गुण अतिशय महत्वाचे मानले जाते, त्यामुळे इस्चुक उमेदवारांनी चांगल्या पद्धतीने तयारी करावी व यशस्वी व्हावे.पूर्वतयारी वर्ग दोन विभागात असून रविवार व अन्य दिवशी चार तास घेतले जाईल. खाजगी नोकरीत असलेल्या उमेदवारांना रविवारी फक्त चार तास तर अन्य नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना सोमवार ते शनिवार संध्याकाळी 2 ते 6 पर्यत वर्ग घेतले जाईल असे चेअरमन पार्सेकर यांनी सांगितले.

पार्सेकर कॉलेजच्या सामाजिक बांधिलकी व अंतर्गत दर्जा माध्यमातून प्रशिक्षण उपक्रम हाती घेतल्याचे चेअरमन पार्सेकर यांनी सांगितले.फक्त शैक्षणिक क्षेत्रात नसून युवक-युवती स्वबळावर व स्वकर्तुत्वाने यशस्वी होण्यासाठी हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ मदतीचा हात देत असून,कॉलेजचा अध्यापक वर्ग,विनाशुल्क कसलेही मानधन न घेता, इच्छुकांना प्रशिक्षित करीत आहेत असे चेअरमन पार्सेकर यांनी नमूद केले.दोन्ही वर्गात सहभागी 150 उमेदवारांना माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य उद्देश नाटेकर, अंतर्गत दर्जा विभागाचे प्रा प्रितेश नाईक,प्रा पंडित उपस्थित होते.
फोटो
हरमल—पार्सेकर कॉलेजतर्फे युवा मार्गदर्शन उपक्रमात बोलताना चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सोबत प्राचार्य उदेश नाटेकर, प्रा प्रितेश नाईक,प्रा पंडित

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar