तुळसी चे औषधी गुणधर्म

.

तुळस ही अनन्यसाधारण महत्त्व असणारी वनस्पती. तुळस वर्गात २६ प्रकारच्या वनस्पती आहेत. या सर्व सुगंधी व झुडूप प्रकारात मोडतात. या सर्व पौष्टिक, ज्वरघ्न, उत्तेजक, बल्य व कृमिघ्न आहेत. सर्वाना वास येतो, सर्वात कडू रस असतो. तुळशीत प्रमुख दोन प्रकार आहेत. कृष्ण व श्वेत. काळी म्हणजे कृष्णतुळस व श्वेत म्हणजे वैजयंती तुळस. कृष्ण तुळसचे सर्व भाग औषधात वापरतात. मंजिऱ्या (फुले) येण्यापूर्वी तुळशीच्या झाडात औषधी गुणधर्म पूर्णपणे भरलेले असतात. औषधात वापरताना मंजिऱ्या आलेली तुळस वापरू नये. तुळस शीतप्रधान रोगात वापरतात. ज्वरात तुळशीचा अंगरस मिरपूडबरोबर देतात, तर अंगदुखी फार असल्यास ओवा व निर्गुडीबरोबर देतात. सर्दीच्या ज्वरात, कफासाठी तुळशीचा रस मधाबरोबर देतात. हिवताप असणाऱ्या ठिकाणी तुळस लावल्यास हिवताप येत नाही. म्हणजेच आपल्याकडे तुळशीची झाडे वेगवेगळ्या जागी असतील तर (तुळशीबाग) त्या घरातील व्यक्तींना हिवताप (मलेरिया) होत नाही. तुळस कृमिघ्न आहे. उलटी होत असल्यास तुळशीच्या पानांच्या अंगरसाने ती थांबते

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar