पानांचा ओवा
मखमली पोपटी रंगाची पाने असलेले हे झाड बहुतेक जणांच्या कुंडीत असतेच. या पानांना ओव्यासारखा वास येतो. याची भजी खूप छान लागतात. याच्या पानांना वास येतो, पण फुले येत नाहीत. वाताच्या विकारावर या पानांचा चांगला उपयोग होतो. पानांचा रस घेतल्याने गॅसेस कमी होतात.