अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या गोवा शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर आणि सरचिटणीस नामदेव धारगळकर

.
अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वारखंडकर आणि सरचिटणीसपदी नामदेव धारगळकर यांची निवड करण्यात आली आहे.अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे : विठू कोरगावकर व अमर फरास, सचिव : उमेश कोरगावकर, संघटक : सागर हडफडकर, सागर कांबळे, नवसो गावकर व रघुवीर कोरगावकर, खजिनदार : दत्तगुरू आरोसकर, उपखजिनदार : अँथनी डिसोझा, सभासद : हेमंत चोपडेकर, लाला धारगळकर, अतुल चोपडेकर, वासुदेव साळकर, गीतेश कांबळे, दिलीप इब्रामपूरकर, दीप धारगळकर व देवानंद पालयेकर.
              राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ॲड. आनंद सुर्वे यांच्या निर्देशानुसार ही बैठक धागरळ येथील समाजमंदिरात घेण्यात आली. कार्यकारिणी निवडण्यापूर्वी ज्ञानेश्वर वारखंडकर यांच्‍या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्‍या मूर्तीला पुष्पांजली वाहण्यात आली. तसेच नामदेव धारगळकर यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला, तर अँथनी डिसोझा यांनी दादू मांद्रेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
     या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर म्हणाले, ऑल इंडिया रिपब्लिकन पक्ष हा एक कुठल्या एका जाती-धर्माचा नसून, तो सर्व गोरगरीब जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे कार्य गोव्यात गतिमान करावे.
फोटो………. अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीच्या गोवा शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर आणि सरचिटणीस नामदेव धारगळकर यांच्यासमवेत अन्य नवनिर्वाचित पदाधिकारी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें