बागा, कळंगुट येथे टिटोज या नावाने सुरू असलेल्या जागतिक किर्तीच्या आस्थापनाला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर टिटोज या ब्रँडचा हॉटेल, मार्केटिंग, मनोरंजनात्मक व खाद्य क्षेत्रात विस्तार करीत असल्याची घोषणा टिटोजक्लब चे भागीदार रिकार्डो डिसोझा यांनी टिटोज क्लब मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली, यावेळी भागीदार तथा त्यांचे भाऊ डेव्हीड डिझोझा उपस्थित होते.
गोव्यातील पहिला डिस्को थेक असलेला क्लब टिटोज हा गोव्यातील नाईट लाईफ प्लेस म्हणून प्रसिद्ध आहे.1971 मध्ये सुरू झालेल्या या क्लब मुळे येथील रस्ता सुद्धा टिटोज लेन म्हणून प्रसिद्ध आहे, क्लब टिटोज, टिटोज अरेना व कॅफे मॅम्बो या नावाची तीन आस्थापने टिटोज कडून सध्या सुरू असून कॅफे मॅम्बो मध्ये एकावेळी दहा हजार लोक पार्टीसाठी एकत्र येऊ शकतात.
क्लब टिटोज चा आता गोव्या बाहेर विस्तार करीत असून पुणे येथे एक फ्रंचायसी सुरू करण्यात आली आहे, येत्या 18 महिन्यात आणखी 27 फ्रंचायसी गोव्याबाहेर सुरू होतील.टिटोज हॉटेल्स नावाने दोन प्रकल्प सुरू असून 2022 पर्यत आणखी सहा हॉटेल प्रकल्प सुरू होतील. तसेच 19 नोव्हेंबर 2021 पासून टिटोज ईट्स, टिटोज ट्रॅव्हल्स व टिटोज स्पिरिट्स ची सुरवात करीत असल्याचे रिकार्डो व डेव्हीड यांनी सांगितले.
टिटोज फाऊंडेशन च्या माध्यमातून डिसोझा बंधू कडून अनेक उपक्रम आतापर्यंत राबवले गेले, कोवीड काळात गरजवंताना अन्नधान्य व आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली, काही बेघरांना निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली, याची कोणतीही प्रसिद्धी करण्यात आली नाही.आपण कधीच टिटोज बंद करतो म्हणून सांगितले नव्हते, तर आपणाला शासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवला होता. निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय अजूनही आहे, तो आपला वैयक्तिक असून आई व भावाचा त्याला विरोध आहे. आपणाला पैशाची कमतरता नाही तरी सुद्धा आपण निवडणूक समाजकार्याकरिता लढवण्याचा विचार करीत आहे कारण गोव्यातील मंत्री, आमदार, शासकीय अधिकारी भ्रस्टाचारी झालेले आहेत असे रिकार्डो यांनी आरोप केला.
फोटो……… पत्रकार परिषदेत बोलताना क्लब टिटोज चे भागीदार रिकार्डो डिसोझा सोबत डेव्हीड डिसोझा……. (रमेश नाईक )