आर. जी. स्टोन हॉस्पिटल व जायंट गृप आफ सहेली खोली यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वैद्यकीय शिबीर गणेशपुरी म्हापसा येथील अवर लेडी ऑफ perpetual succor चॅपल येथे पार पडले. या शिबीराचे उदघाटन फादर लुईस गोम्स यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेविका डॉ नुतन बिचोलकर उपस्थित होत्या त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की आरोग्य हीच खरी संपत्ती होय, त्यासाठी आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे
यावेळी डॉ. स्वामी दीवकर, डॉ. मयुरी कलंगुटकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. सुजय मिक्षा, आर. जी. चे. इन चार्ज विकास, कल्पना, आदी उपस्थित होते. यावेळी मधुमेह तसेच रक्त तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भक्ती परब, सिद्धिका बांदेकर, अंकुश पेडणेकर, रीबेलो यांनी सहकार्य केले. कायक्रमाचे सुत्रसंचालन सिनोशका soares यांनी केले. या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाथ ५० लोकांनी घेतला
फोटो भारत बेतकेकर