येत्या विधानसभा निवडणुकीत शिवोली मतदार संघातून डिलायला लोबो यांना भाजपाची तिकिट मिळण्याची शक्यता नाहीच ,परिणामी डिलायला लोबो डिसेंबर महिन्यात भाजप सोडणार असल्याचे सूतोवाच डिलायला लोबो यांचे पती घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिले आहे . शिवोली येथे डिलायला लोबो यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लोबो यांनी हि माहिती दिली.
ते म्हणाले, शिवोली मतदार संघातून तिकीटाची मागणी केलेली नाही, पक्ष एकाच कुटुंबातील दोघांना तिकीट देणारही नाही.त्यामुळे डिलायला लोबो डिसेंबर महिन्यात भाजप महिला मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे.पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा डिसेंबर मद्धेच होऊ शकते .त्यापूर्वीच डिलायला लोबो आपला निर्णय घेणार आहेत. सध्या तरी शिवोली संघात स्वतंत्रपणे काम करीत आहेत.गावागावात मतदाराची भेट घेत आहेत .लोकांच्या समस्या जाणून घेत असल्याचे लोबो यांनी सांगितले, मतदार संघातील लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलयाचे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.
पाऊस पडत असूनही मोठ्या संख्येने शिवोली येथे डिलायला मायकल लोबो यांच्या निवडणूक प्रचार कार्यालच्या उदघाटन सोहळ्याला लोकांनी उपस्थतीती दर्शविली.
बामणवाडा येथील सेंट अँथनी चर्च जवळ शनिवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला .या पावसातच कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले, त्यानंतर कार्यालयासमोर सभेचे आयॊजन केले.यसभेला मंत्री मायकल लोबो ,डिलायला लोबो ,ओशेल सरपंच वंदना नार्वेकर ,उपसरपंच प्रवीण कोचरेकर,पंच मंगेश चोडणकर ,मार्ना शिवोली सरपंच शर्मिला वेर्णेकर ,उपसरपंच विलियम फर्नांडिस ,पंच महेश्वर गोवेकर, फेर्मीना फर्नांडिस ,सिल्वेस्टर फर्नांडिस,मोनाली पेडणेकर , विघ्नेश चोडणकर ,सडये सरपंच निलेश वायंगणकर ,आसगाव सरपंच हनुमंत नाईक ,उपसरपंच रिया नाईक , पंच श्रीसागर नाईक,हणजूण पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर, हनुमंत गोवेकर ,शीतल दाभोलकर ,संदेश खोर्जुवेकर ,वेर्ला कणका सरपंच अमिता कोरगावकर ,माजी जिल्हा पंचायत सदस्य वासुदेव कोरगावकर तसेच गजाजन तिळवे व इतर उपस्थित होते .
चांगल्या माणसाला निवडून आणायची गरज आहे,काही जण धर्म जातीच्या आधारे मते मागतील . पण मतदारांनी माणुसकीला जपून मतदान करणे गरजेचे आहे .पंचवीस वर्षात जे झाले नाही ते पुढील पाच वर्षात पाहायला मिळणार आह असे मायकल लोबो यांनी आपल्याच भाषणात स्पष्ट केले.वीज,रास्ता ,पाणी पुरवठ्यात सुधारणा करणे तसेच स्वयंरोजगार मदत करण्यास हातभार लावणे असाअनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहे.शिवोलीत चांगले मैदान नाही, यासाठी कुणी पुढाकार घेतलेला नाही, येत्या निवडणुकीत चांगले चेहरे दिसतील..लोकांसाठी चांगले काम करणारे दिसतील.सध्याच्या विधानसभा अधीवेशानात चांगले काम झाले नाही. सरकारी कार्यालयात कामे लवकर झाली पाहिजे. टॅक्सी व्यावसायिकांचा विषय सोडविणे सोपे आहे पण कुणी हा विषय सोडवायला तयारच नाही. आम्ही गोमंतकियांचा विचार करायला हवा. यासाठी चांगले व्यक्ती निवडून यायला हवेत असेही लोबो यांनी स्पष्ट केले .
यावेळी निलेश वायंगणकर,मंगेश चोडणकर ,शर्मिला वेर्णेकर ,सिल्वेस्टर फर्नांडिस, हनुमंत नाईक, सुरेंद्र गोवेकर ,डिलायला लोबो यांनीही भाषणे केली.
फोटो………….शिवोली येथे सभेत बोलताना मंत्री मायकल लोबो सोबत डिलायला लोबो व इतर पंचायतीचे सरपंच व पंचसदस्य……. ( रमेश नाईक )