पंचायतीच्या न कर्तेपणामुळे हणजूण कायसूववासीय चांगल्या आरोग्य सेवेपासून वंचित

.
पंचायतीच्या न कर्तेपणामुळे हणजूण कायसूववासीय चांगल्या आरोग्य सेवेपासून वंचित

 म्हापसा दि.24 ( प्रतिनिधी )

      वागातोर शापोरा येथील ग्रामीण दवाखान्याचा दर्जा वाढवण्यासंदर्भात हणजूण कायसूव पंचायतीच्या ग्रामसभेत बऱ्याच वर्षांपासून अनेक वेळा मागणी करून व ठराव घेऊनही हणजूण कायसूव पंचायतीने कोणताही पाठपुरावा न केल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
        शिवोली मतदार संघातील हणजूण कायसूव वागातोर येथील लोकांना सरकारी आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या करिता गोव्याच्या आरोग्य खात्याने वागातोर येथे हणजूण कोमुनिदाद कडून 5000 चौ. मी. जागा ताब्यात घेऊन फक्त 100 मी. जागेत एक छोटासा दवाखाना दि.8 सप्टेंबर 1994 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेंड डिसोझा यांच्या हस्ते उदघाट्न करून सुरू करण्यात आला. त्यावेळी येथील लोकसंख्याही कमी होती आणी पर्यटकही मोठया प्रमाणात येत नव्हते, पण आता परिस्थिती बदलली असून 27 वर्षानंतर या दवाखान्याचा दर्जा काही बदललेला नाही.आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ठराविक वेळेतच या ठिकाणी एक डॉक्टर उपलब्ध असतो, लोकसंख्या व पर्यटक वाढल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे त्यातच या भागात लहान मोठे अपघात व काही घटना घडतात त्यावेळी उपचारासाठी शिवोली आरोग्य केंद्रात जावे लागते, म्हणून या दवाखान्याचा दर्जा वाढवून उप आरोग्य केंद्राचा दर्जा द्यावा व रोज या ठिकाणी डॉक्टर्स ची उपलब्धता करावी या करिता या दवाखान्याच्या जागी किंवा उपलब्ध जागेत दुसरी इमारत बांधवी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
            या मागणी साठी ग्रामस्थांचा आवाज सरकारपर्यत पोहचावा म्हणून ग्रामसभेत लेखी ठराव मांडण्यात आले पण हणजूण कायसूव पंचायतीने पर्यायाने गेली दहा वर्षे उपसरपंच – सरपंच पदाची धुरा सांभाळणाऱ्या सावियो अल्मेदा यांनी अनेकदा ग्रामसभेत जाब विचारल्यानंतर 2 नोव्हेंबर 2019 रोजी आरोग्य संचालानयास व आरोग्य मंत्र्यांना ठरवाची प्रत पोस्टाने पाठवून देण्याचे कार्य केले,  त्या पूर्वीच्या ठरावांना फक्त केराची टोपली दाखवली.
ठराव पाठवल्यानंतर दोन वर्षे झाली पण कोणताही व कोणाकडेही कसलाही पाठपुरावा केला नसल्याचे माहिती हक्काद्वारे मिळालेल्या माहिती वरून समजते.
        वागातोर येथील हा ग्रामीण दवाखाना शिवोली आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने या केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. साधना शेट्ये यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार वागातोरच्या या दवाखान्याचे कौलारू छप्पर जीर्ण झाल्याने ते दुरुस्तीची सरकारने निविदा काढली आहे, दुरुस्ती पुर्वी दवाखाना दुसरीकडे हलवावा लागेल म्हणून हणजूण कायसूव पंचायतीकडे दुसऱ्या जागेची मागणी केली आहे पण बरेच दिवस झाले तरी पंचायतीकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.
      दरम्यान पंचायतीकडे दवाखान्याच्या जागेसाठी मागणी करण्यात आली आहे, पंचायतीच्या बैठकीत ती मांडून त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरपंच सावियो अल्मेदा यांनी सांगितले.
    एरव्ही बरेच निर्णय बैठकीत न मांडता परस्पर घेतले जातात मग या निर्णयास विलंब का असा प्रश्न करून पंचायतीच्या न कर्तेपणामुळे येथील जनता चांगल्या आरोग्य सेवेस मुकत असल्याचा आरोप पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी केला.
     फोटो………… वागातोर शापोरा येथे आरोग्य खात्यातर्फे सुरू असलेल्या ग्रामीण दवाखान्याची इमारत, बाजूला असलेली पडीक जागा……… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar