सडयेचे माजी उप-सरपंच लियो डायस यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर,

.

म्हापसा दि. 23  ( प्रतिनिधी )

        भाजपचे सरकार आणी प्रशासन आतापर्यंत गोमंतकीय जनतेपासून फारच लांब गेले होते आणी आजही आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर सारवासारव करण्यासाठी सरकार तुमच्या दारी म्हणत फार्स करण्याची त्यांच्यावर वेळच आली नसती असा  आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शिवोलीत केला.
             कॉग्रेसच्या  महागाईविरोधात आयोजित  राज्यस्तरीय  कार्यक्रमाचा एक भाग या नात्याने शिवोलीत काढण्यात आलेल्या जागोर कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर व बादें -आंसगांव येथे काँग्रेस कार्यालयाचे उदघाट्न केल्यानंतर  चोडणकर बोलत होते. यावेळी सडयेचे माजी उप- सरपंच तथा स्थानिक  कोमुनिदादचे अध्यक्ष लियो डायस यांना चोडणकर यांच्या उपस्थितीत रितसर पक्ष प्रवेश देण्यात आला.
            यावेळी पक्षाचे प्रभारी बाबी बागकर,प्रदेश समितीच्या उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सांळगांवकर शिवोली गट कॉग्रेसच्या अध्यक्षा पार्वती नागवेंकर, माजी मंत्री तथा कॉग्रेसचे नेते चंद्रकांत चोडणकर, सेवा दल शिवोलीचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर, म्हापसा नगरपारीकेचे नगरसेवक तारक आरोलकर, सडयेचे माजी सरपंच फ्रान्सिस् फर्नाडिस , युवा अध्यक्ष अड. रोशन चोडणकर, माजी गटाध्यक्ष राजन घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
            येत्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचेच सरकार सत्तेवर येणार असून शिवोलीचा विजयी कॉग्रेस उमेदवार आमदार म्हणून त्या सत्तेत राहाणार असल्याचे  चोडणकर यांनी यावेळी सांगितले. डॉ. प्रमोद सांळगांवकर, अड. चंद्रकांत चोडणकर, दत्ताराम पेडणेकर, बाबी बागकर,  फ्रांन्सिस् फर्नाडिस, यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवा अध्यक्ष अड. रोशन चोडणकर, जगन्नाथ गांवकर आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली.
        यावेळी शिवोली बाजार परिसरात कॉग्रेस गट समीती व इतरांकडून  चुलीवर चहा करून भाजप सरकार प्रणीत  महागाई विरोधात निषेधात्मक  जाहीर  जागोर करण्यात आला.  सुरुवातीला,  गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर  माजी गट अध्यक्ष राजन घाटे यांनी सुत्रसंचालन केले.

 फोटो………..सडयेचे माजी उप-सरपंच लियो डायस यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सोबत माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर,  शिवोली गट समितीच्या अध्यक्षा पार्वती नागवेंकर व इतर पदाधिकारी……… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar