म्हापसा येथील साहित्यिक डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या ‘काळीज-हाक’ या मराठी लेखसंग्रहाचे प्रकाशन

.
म्हापसा दि. 25  ( प्रतिनिधी )
म्हापसा येथील साहित्यिक डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या ‘काळीज-हाक’ या मराठी लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवार २७ नोव्हेंबर रोजी विर्नोडा-पेडणे येथे होणाऱ्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या २८व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाट्न सत्रात होणार आहे. हे त्यांचे विसावे पुस्तक जागर प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केले आहे.
    डॉ. नाटेकर यांनी आतापर्यंत मराठी, कोकणी, हिंदी व इंग्रजी अशा चार भाषांत तसेच कादंबरी, वैचारिक, नाटक अशा वाङ्‍मयप्रकारांत ग्रंथलेखन केले आहे. ‘एक वादळ घोंगावताना’ ही त्यांची मूळ मराठी कादंबरी हिंदी, कोकणी व इंग्रजी अशा तीन भाषांत रूपांतरित झाली आहे. आतापर्यंत त्यांचे बारा लेखसंग्रह, दोन नाटके व तीन कादंबऱ्या पुस्तकरूपाने आल्या आहेत. लवकरच त्यांचा मराठी काव्यसंग्रहही प्रकाशित होणार आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें