मार्ना शिवोली येथे रस्त्याच्या हॉटमिक्सींग डांबरीकरणाचा शुभारंभ

.
शिवोली मतदार संघातील मार्ना शिवोली या रस्त्याच्या रेंगाळलेल्या हॉटमिक्सींग डांबरीकरणाचा शुभारंभ शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला पण पावसामुळे प्रत्यक्ष हॉटमीक्सिंगचे काम लांबणीवर पडले.
                सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली होती, ती मध्यंतरी डागडुजी करीत सरकारने हे खड्डे बुजविले होते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताची भीती असायची. तर खड्डेमय मार्गातून रस्ता काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागायची. या समस्येबाबत स्थानिकांपासून प्रवाशांनी वेळोवेळी अधिकार्‍यांशी वारंवार चर्चा करून ग्रामस्थांच्या तक्रारी मांडल्या होत्या. शिवाय अनेकदा निदर्शने केली होती.
           तीन वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण करणे रखडले होते. तिलारी प्रकल्पामुळे हे काम लांबले. आज या कामाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. परंतु, वरुण राजाचे सहकार्य नसल्याचे दिसले. पावसाने उसंत घेताच हे डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाईल. त्यामुळे अखेर मार्ना-शिवोली या रस्त्याचे डांबरीकरण होणार असल्याची प्रतिक्रिया विनोद पालयेकर यांनी दिली.
         हा मुख्य रस्ता असून म्हापशाच्या दिशेने असो किंवा पेडणे, मांद्रे बाजूला जाण्यासाठी लोक याच मार्गाचा अवलंब करतात. पावसाने उघडीप देताच, हा मार्ग डांबरीकरण केला जाईल. नैसर्गिकाविषयी कुणीच काही सांगू शकत नाही. आमची सर्व तयारी आहे, पण पावसामुळे ते आज हॉटमिक्सींगचे काम होऊ शकत नाही. परंतु, आज आम्ही नारळ वाढवून विधिवत याचे उद्घाटन केले आहे. पाऊस थांबण्याची प्रार्थना आम्ही देवाकडे करू शकतो. या कामासाठी अंदाजित तीन कोटी रुपयांचा खर्च असल्याचे पालयेकर म्हणाले.
कामानिमित्त मुख्यमंत्र्यांशी संपर्क येतोच.
डॉ. प्रमोद सावंत हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने मी त्यांना भेटण्यास जातो. त्यात काहीही गैर नाही, याचा अर्थ मी काही भाजपाकडे गेलो असा होत नाही. कामानिमित्त मुख्यमंत्र्यांचा संपर्क हा सर्वांशी येतोच. काहीजण विनाकारण राजकारण करतात. आमच्या मनात कुठलाही छुपा अजेंडा नाही. परंतु, काहीजण शिवोलीत येऊन उगाच राजकारण करतात. मात्र, शिवोलीतील मतदार हे सुजाण आहेत. जी कामे पूर्वी झाली नाहीत, ते मी करून दाखविल्याचा दावा विनोद पालयेकर यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केला. जलस्त्रोत मंत्री असताना त्याच संबंधितांची मी ४० कोटींचे काम मंजूर करून दिली असून यापुढेही मी सदैव शिवोलीसाठी झटत राहणार असे ते म्हणाले.
     फोटो……. मार्ना शिवोली येथे रस्त्याच्या हॉटमिक्सींग डांबरीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर उवस्थित नागरिक व कार्यकर्त्यांसोबत आमदार विनोद पालयेकर……… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar