म्हापसा दि. 26 ( प्रतिनिधी )
कळंगुट मतदार संघातील मुलामुलींना चांगली मैदाने उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध आहे, या मतदार संघातील कळंगुट, कांदोळी व पर्रा पंचायत क्षेत्रात आता पर्यत चांगली मैदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, हडफडे नागवा पंचायतीने सहकार्य केल्यास यापंचायत क्षेत्रात चांगले क्रीडा मैदान उपलब्ध होईल असे आश्वासन बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिले.
हडफडे येथे बांधण्यात आलेल्या चौरंगीनाथ बॅडमिंटन कोर्ट चे व सिमबॉयज आरपोरा आयोजित पहिल्या कळंगुट व शिवोली मतदारसंघ मर्यादित पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा चे उदघाट्न मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हडफडे नागवाचे माजी सरपंच तथा या प्रभागाचे विद्यमान पंच राजेश मोरजकर, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर, चौरंगीनाथ देवस्थानचे अध्यक्ष बाबली मांद्रेकर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
फोटो…….. हडफडे येथे चौरंगीनाथ बॅडमिंटन कोर्ट चे उदघाट्न करताना मंत्री मायकल लोबो सोबत इतर मान्यवर…