सिमवाडा हणजूण येथील श्रीराम पंचायतन देवस्थान परिसरात सौदर्यीकरण व पेवर्स बसवण्याच्या कामाचा शुभारंभ

.

म्हापसा दि. 27  ( प्रतिनिधी )

     जिल्हा पंचायत निधीतून सुमारे 17 लाख खर्चून हणजूण येथे दोन विकासकामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
      यात सिमवाडा हणजूण येथील श्रीराम पंचायतन देवस्थान परिसरात सौदर्यीकरण व पेवर्स बसवण्याचे काम 12 लाख खर्चून करण्यात येणार आहे तर हणजूण बांध येथील गणपती विसर्जन स्थळाजवळ 5 लाख खर्चून पेवर्स घालण्यात येणार आहेत.
        या प्रसंगी हणजूण च्या जिल्हा पंचायत सदस्य निहारिका नारायण मांद्रेकर, शिवोली भाजपा मंडळ अध्यक्ष मोहन दाभाळे,  सचिव दिगंबर आगरवाडेकर, महिला मोर्चा च्या पूजा चोडणकर,  माजी मंडळ अध्यक्ष तथा देवस्थान समितीचे नारायण मांद्रेकर व कार्यकर्ते आणी नागरिक उपस्थित होते.
        यावेळी हणजूणच्या जिल्हा पंचायत सदस्य निहारिका नारायण मांद्रेकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते व स्थानिकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
      फोटो……सिमवाडा हणजूण येथील श्रीराम पंचायतन देवस्थान परिसरात सौदर्यीकरण व पेवर्स बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करताना माजी मंत्री दयानंद मांद्रेकर सोबत निहारिका मांद्रेकर व इतर……… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar