राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे राष्ट्रीय एक दिवसीय अधिवेशन

.

हरमल वार्ताहर

राष्ट्रवादी युवा किसान संघटनेचे राष्ट्रीय एक दिवसीय अधिवेशन प्राईड प्लाझा,एरोसिटी नवी दिल्ली च्या वातानुकूलित सभागृहात संपन्न झाले.ह्या अधिवेशनात प्रसिध्द अभिनेते बिंदू दारासिंग खास पाहुणे नात्याने उपस्थित होते.

ह्या अधिवेशनात तिरुपती श्री बालाजी मंदिराचे विश्वस्त श्री शंभुनाथ महंत उपस्थित होते.किसान राष्ट्राचा अभिमान व शान असून त्यांच्या प्रत्येक कृतीला संघटनेचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.’जय जवान, जय किसान,ह्या पंक्तीनुसार देशात जवान व किसानाचा गौरव केला पाहिजे.इतिहासात किसानांच्या समस्यांना वाली नसल्यागत कार्य चालू आहे.मात्र देशांतील किसानांच्या पाठीशी राजकीय मंडळी पाठीशी असल्याची सोंगे वठवीत आहेत, मात्र सुखसोयी उपलब्ध करण्याच्यावेळी कानाडोळा करून त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचे श्री बालाजी देवस्थानचे महंत यांनी व्यक्त केले.आपण धार्मिक, सांस्कृतिक संघाशी जोडले गेलो आहे.मात्र ह्या संघटनेच्या माध्यमातून किसान जोडण्यापेक्षा किसान जगला पाहिजे हे उद्दिष्ट ठेऊन कार्यरत राहण्याचे आवाहन महंत यांनी केले.यावेळी किसान संघटनेतर्फे श्री महंत याना संघटनमंत्री हे जबाबदारीचे पद सोपविण्यात आले.संघटनेचे अध्यक्ष ऍड राहुल त्रिवेदी यांनी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले.गेल्या वर्षभरात संघटनेने अनेक उपक्रम हाती घेतले व किसानाच्या समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.देशातील किसान उपाशी राहता कामा नये किंवा त्यांना हताश ठेवता येणे शक्य नाही.चरितार्थ हा महत्वाचा असून कुटुंबाचे पालन किसानांना सहजपणे करता आले पाहिजे.त्यासाठी सरकारकडून त्यांना आवश्यक मदत व आधारभूत किंमत देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे मत संघटनेचे अध्यक्ष ऍड त्रिवेदी यांनी व्यक्त केले.सध्या संघटना बाल्यावस्थेत असून आगामी .

संघटना बाल्यावस्थेत असून आगामी काळात देशभरात विस्तार होणे आवश्यक आहे. संघटनेची सदस्यसंख्या वाढविण्यावर भर दिला पाहिजे तसेच दरवर्षी अधिवेशन घेऊन संघटनेचे कार्य व्यापक व पारदर्शकता जोपासून करणे उचित होईल असे प्रतिपादन अध्यक्ष त्रिवेदी यांनी केले.यावेळी व्यासपीठावर महामंत्री विनोदभाई सोळंकी, दिल्ली विभाग अध्यक्षा अनिता ठाकूर,पदाधिकारी अनिल दूत,युवा संघटनमंत्री ऋषी कौल,भारतीय पत्रकार संघ विक्रम सेन,राष्ट्रीय संयोजक उदयन कुलक्षेत्र,सुभाष सरोहा,उपाध्यक्ष मनोजकुमार (बरोडा) आदी उपस्थित होते.यावेळी प्रदीप जोशी (ओरिसा)प्रवीण व्यास (मध्यप्रदेश)भारत बेतकेकर (गोवा)समीर (हरियाणा) मशकुर अहमद भट (जम्मु) आदींची भाषणे झाली.ह्या अधिवेशनात देशांतील 17 राज्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.सुत्रनिवेदन वीणा वादिनी तर युवा अध्यक्ष ऋषी किलम यानी आभार मानले.

फोटो
नवी दिल्ली—-राष्ट्रवादी युवा किसान संघटनेच्या अधिवेशनात अध्यक्ष राहुल त्रिवेदी सोबत बिंदू दारासिंग,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar