… वागातोर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

.
म्हापसा  दि. 28  ( प्रतिनिधी )

      जनतेला पाणी, वीज व रस्ते या प्राथमिक सेवा देण्याबरोबरच चांगली आरोग्य सेवा मिळावी या करिता सरकारने व लोकप्रतिनिधीने लक्ष देणे गरजेचे आहे, पुढील सरकारात आपण वागातोर येथील ग्रामीण दवाखान्याचा दर्जा वाढवण्यासाठी प्रथम मागणी असेल असे आश्वासन घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी दिले.
           वागातोर येथील सेंट मायकल हायस्कुल सभागृहात पर्रा च्या सरपंच डिलायला लोबो यांच्या सहकार्याने हणजूण च्या युथ युनायटेड क्लब ने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाट्न केल्यानंतर मंत्री लोबो यांनी बोलताना सांगितले की किनारी भागात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, अश्या ठिकाणी  अपघात, हृदय विकारासारख्या गंभीर घटना घडतात अश्या वेळी त्यांना त्वरित चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही, किनारी भागातील आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवण्याची व चांगल्या सुविधा देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
      रोगावर इलाज करण्यापेक्षा रोग होणार नाही यांची काळीज घेणे गरजेचे आहे, सर्वांनी सर्व प्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या आरोग्य तपासणी शिबिरातील जर कोणाला मोतीबिंदू व इतर कोणतेही ऑपरेशन करावयाचे असेल तर ते मोफत करून दिले जाईल, तसेच पुढील काळात दर सहा महिन्यात अशी आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित केली जातील असे डिलायला लोबो यांनी सांगितले.
        यावेळी पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर, हनुमंत गोवेकर, शीतल दाभोळकर, शकुंतला चिमुलकर युनायटेड युथ चे गजानन तिळवे, हायस्कुलच्या व्यवस्थापिका सिस्टर मार्गरेट उपस्थित होते.यावेळी सुरेंद्र गोवेकर यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजना बद्दल डिलायला लोबो यांना धन्यवाद दिले. सुरवातीला गजानन तिळवे यांनी सर्वांचे स्वागत केले तर हनुमंत गोवेकर यांनी आभार मानले.
        सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यत घेण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला, सुमारे 200 हून अधीक लोकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला तर 100 हून जास्त लोकांना मोफत चष्मा देण्यात आले, या शिबिरात मधुमेह चिकित्सा, इसीजी, न्युरोलॉजि, स्किन, ऑर्थोपेडिक, व डोळ्याच्या डॉक्टर्स नी तपासणी केली, डॉ. रुफिन मोंतेरो व त्यांच्या 15 सहकारी डॉक्टर्स यात सहभागी झाले होते, यावेळी रुग्णांना मोफत औषधें देण्यात आली.
       फोटो……… वागातोर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेताना येथील ग्रामस्थ…….. ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar