गोव्यातील भाजपा सरकार रामराज्याचे नसून अधर्माचे झालेले आहे : संजय बर्डे,

.
भाजपा सरकार मधील जर कोणी मंत्री महिला अत्याचारत गुंतलेला असेल तर त्याचे नाव जाहीर करावे व तसे पुरावे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांच्याकडे असतील तर त्यांनी गोवा पोलिसात तक्रार द्यावी नाहीतर तथ्यहिन आरोप केले म्हणून भाजपाने गिरीष चोडणकर यांच्या विरोधात तक्रार द्यावी असे सांगून हवेत गोळीबार करण्याच्या या प्रकरणाची गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव संजय बर्डे यांनी खिल्ली उडवली.
          म्हापसा येथे घेतलेल्या पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की गोव्यातील भाजपा सरकार रामराज्याचे नसून अधर्माचे झालेले आहे, महिलावरील अत्याचाराचे आरोप असलेला हा तिसरा मंत्री, चोडणकर यांनी आरोप केले पण त्या मंत्र्याचे नाव का सांगत नाहीत, कोण कोणाकडे मिलिभगत करीत आहे समजण्यास कठीण आहे, दुसरीकडे जुन्या गोव्यातील ऐतिहासिक वारसास्थळाजवळ भाजपच्या प्रवक्त्याना बांधकाम परवाना देऊन जमिनीवर सुद्धा बलात्कार करण्याचे कार्य भाजपा सरकारकडून करण्यात येत आहे असे बर्डे यांनी सांगितले.
        येत्या चार दिवस बार्देश तालुक्याला पाणी पुरवठा होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे या काळात सरकारने येथील जनतेला टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा करावा आणी जनतेची पाण्याची समस्या सोडवावी असे संजय बर्डे यांनी सांगितले.
    फोटो……. म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव संजय बर्डे सोबत इतर पदाधिकारी…….. ( रमेश naik)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar