म्हापसा दि. 5 ( प्रतिनिधी )
अतिथी देवो भव म्हणून आम्ही सर्व पर्यटकांचे गोव्यात स्वागत करतो पण गोव्यात अंमली पदार्थ अर्थात ड्रक्स नकोत, अंमली पदार्थ मुक्त पर्यटन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, क्लचर टुरिझम व इंटरलेंड टुरिझम कडे पर्यटक नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
वागातोर हणजूण येथे माजी मंत्री तथा शिवोली मतदार संघाचे आमदार विनोद पालयेकर यांनी नव्यानेच सुरू केलेल्या ” सिद्धांनंद रिसॉर्ट ” या अस्थापनाच्या उदघाटनांतर पालयेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले होते.
या अस्थापनाचे उदघाट्न परमपूज्य श्री दत्त पदमनाभ पिठाचे पिठाधिश्वर धर्मभूषण श्रीमत सद्गुरू ब्रम्हेशांनंदाचार्य स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, गोमंतकीय प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर उपस्थित होते.
यावेळी ब्रम्हेशांनंदाचार्य स्वामी महाराजांनी उपस्थित अनुयायीना आशिर्वचपर मार्गदर्शन करून आमदार विनोद पालयेकर यांना त्यांच्या व्यवसायात व राजकीय कारकिर्दीत पुढील वाटचालीत प्रगती व्हावी असा आशीर्वाद देऊन शुभेच्या दिल्या. आमदर जयेश साळगावकर, चित्रकार संजय हरमलकर यांनी शुभेच्छासह आपले विचार व्यक्त केले तर आमदार तथा या अस्थापनाचे मालक विनोद पालयेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
फोटो…… वागातोर हणजूण येथील आमदार विनोद पालयेकर यांच्या आस्थापनाच्या उदघाट्नावेळी उपस्थित ब्रम्हेशांनंदाचार्य स्वामी महाराज, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार जयेश साळगावकर, प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर व आमदार विनोद पालयेकर