सडये शिवोली येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करताना मंत्री मायकल लोबो

.

म्हापसा  /  प्रतिनिधी

         विध्यार्थ्यानी आपल्या आयुष्यात ध्येय बाळगणे गरजेचे आहे, निश्चित ध्येय बाळगून त्या प्रमाणे कृती केल्यास यश हे हमखास मिळेल मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो, शिक्षणाचा पाया मजबूत झाला की यशाचे शिखर गाठण्यास जास्त त्रास लागत नाहीत असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री मायकल लोबो यांनी सडये शिवोली येथे केले.
        सडये शिवोली पंचायती तर्फे पंचायत क्षेत्रातील 2020 -2021 या वर्षात दहावी, बारावी, पदवी पदव्युत्तर परीक्षेत आणी इतर परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या मुलांचा गुणगौरव तसेच करोना योद्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मायकल लोबो उपस्थित होते, यावेळी पर्रा च्या सरपंच तथा शिवोली मतदार संघातील संभाव्य उमेदवार डिलायला लोबो, समाजसेवक गजानन तिळवे,सडये शिवोली पंचायतीचे सरपंच निलेश वायंगणकर, व इतर पंच सदस्य उपस्थित होते.
      स्वप्ने पाहणे वाईट नाही, पण ती स्वप्ने सत्त्यात उतरवण्यासाठी मेहनतीची गरज आहे, अभ्यासात जितकी जास्त मेहनत घ्याल तितके चांगले यश तुमच्या पदरात पडेल, या विश्वात काहीही अशक्य नाही, प्रयत्न करणे महत्वाचे आहे, महात्मा गांधीजींनी सांगितले आहे तुम्हाला काही चांगले करावयाचे आहे, बदल घडवायचा आहे तर तुम्ही पूढे या. आजचा युवक त्या प्रमाणे वागेल अशी आपणाला खात्री आहे असे मंत्री लोबो यांनी यावेळी सांगितले.
         शिवोली मतदार संघातील विध्यार्थी युवकांना लागणारी मदत देण्यास आपण सदैव तयार असेन, असे आश्वासन डिलायला लोबो यांनी यावेळी दिले.
     फोटो……. सडये शिवोली येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करताना मंत्री मायकल लोबो सोबत डिलायला लोबो, निलेश वायंगणकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar