हणजूण पोलिसांनी अक्षय पिल्लई याचे विरोधात अंमली पदार्थ विरोधी कलमाखाली गुन्हा नोंद

.
म्हापसा दि. 5  ( प्रतिनिधी )

      हणजूण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत केरळ येथील युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 23000/- रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला.ही कारवाई दि.5 रोजी पहाटे 4.45 ते 6.50 दरम्यान करण्यात आली.
       अधिक माहिती नुसार आसगाव येथे अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक साहिल वारंग यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत आसगाव येथील हैप्पी बार जवळ सापळा रचला असता पहाटे 4.45 च्या दरम्यान अक्षय रेमानन पिल्लई (20) रा. केरळ हा त्या ठिकाणी येऊन संशायस्पदरित्या घुटमळू लागला, त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 18000/- किंमतीच्या 1.8 ग्राम वजनाच्या वेगवेगळ्या रंगातील व आकारातील 4 इस्टासी या अंमली पदार्थाच्या गोळ्या तसेच रु.5000/- किमतीच्या 5 ग्राम वजनाचा एमडीएमए हा अंमलीपदार्थ सापडला.
          हणजूण पोलिसांनी अक्षय पिल्लई याचे विरोधात अंमली पदार्थ विरोधी कलमाखाली गुन्हा नोंद करून अटक केली असून पुढील तपास निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहिल वारंग पुढील तपास करीत आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar