भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या आयोजन

.

विद्यार्थ्यांत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा हेतू बाळगून 2016 साली सुरू झालेल्या विज्ञान महोत्सवाच्या 7 व्या पर्वात भर पडत गेली हे चांगले लक्षण आहे.आजचे विध्यार्थी हे खरे भाग्यवान आहेत.पूर्वी हरमलात 7 वी पर्यत शिक्षण सुविधा होती व आता गावोगावी शिक्षणाच्या सुविधा आहेत.डॉ भाऊ दाजी लाड,डॉ काकोडकर आदी शास्त्रज्ञ ह्या भूमीत तयार झाले त्याचे कारण सुविधा निर्माण झाले.देशाचे स्थान वैज्ञानिक प्रगतीवर अवलंबून आहे व असते, त्यामुळे भावी पिढीतील विद्यार्थ्यांनी विज्ञानात रसग्रहण करून कीर्ती प्राप्त करावी अशी हाक पंचक्रोशी संस्थेचे चेअरमन पार्सेकर यांनी दिली.

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 अंतर्गत  आझादी का अमृतमहोत्सव विज्ञान रथाचे हरमल पंचक्रोशीच्या पटांगणावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.पणजीतील कांपाल मैदानावर 10 ते 13 डिसेंबर पर्यत होणाऱ्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली असल्याचे गोवा विज्ञान परिषदेचे प्रमुख डॉ पै यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी हा हेतू बाळगून 2016 साली सुरू झालेल्या विज्ञान महोत्सवाच्या 7 व्या पर्वात भर पडत गेली हे चांगले लक्षण आहे.आजचे विध्यार्थी हे खरे भाग्यवान आहेत.पूर्वी हरमलात 7 वी पर्यत शिक्षण सुविधा होती व आता गावोगावी शिक्षणाच्या सुविधा आहेत.डॉ भाऊ दाजी लाड,डॉ काकोडकर आदी शास्त्रज्ञ ह्या भूमीत तयार झाले त्याचे कारण सुविधा निर्माण झाले.देशाचे स्थान वैज्ञानिक प्रगतीवर अवलंबून आहे व असते, त्यामुळे भावी पिढीतील विद्यार्थ्यांनी विज्ञानात रसग्रहण करून कीर्ती प्राप्त करावी अशी हाक पंचक्रोशी संस्थेचे चेअरमन पार्सेकर यांनी केले

गोवा विज्ञान परिषदेने आयोजित केलेल्या विज्ञान महोत्सवात गोव्यातील विध्यार्थी व पालकांनी सहभाग घ्यायला पाहिजे,ह्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पुर्विकाळी अश्या महोत्सवाचा लाभ होत नसे, त्यामुळे आपण विध्यार्थी भाग्यवान आहात.भविष्यात आपणाला कोण व्हायचंय, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे.त्यासाठी पुरेशी माहिती व ज्ञान अवगत असणे आवश्यक असते.विज्ञानाच्या असंख्य शाखेची साधना करून आपण उत्तम वैज्ञानिक व शास्त्रज्ञ होऊ शकतो.भौतिक, रसायन,बायोटेक्नॉलॉजी, अवकाश विज्ञान आदीतून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञमंडळी 10 ते 13 डिसेंम्बर पर्यत पणजीत असणार आहेत.गोव्यातील शालेय विध्यार्थ्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करण्यात येईल.भारतीय अंतराळवीर (इसरो) संस्थेतर्फे गगनयान नावाचे यान अवकाशात झेपावणार आहे.त्याची छोटी प्रतिकृती गोव्याच्या महोत्सवात विद्यार्थ्यांकडून आकाशात सोडली जाईल व विश्वविक्रम करणार आहोत.खगोलीय आकाशात तारे, नभा मंडळचा अभ्यास करण्यास रेडिओ टेलिस्कोप आवश्यक असतो,तो देशांत असल्याने त्याचा गौरव जगाने केला आहे.देशाने 75 वर्षात वैज्ञानिक क्षेत्रांत केलेलं संशोधन ह्या चार दिवसीय महोत्सवात अनुभवण्यास मिळेल.गोव्याचे नाव देशात व जगभरात होईल असे कार्य करण्याची उर्मी ह्या महोत्सवातून मिळेल.डॉ रघुनाथ माशेलकर, पं लता मंगेशकर आदी तज्ञमंडळी गोव्यातील भूमीने दिले त्याशिवाय विज्ञान लघुपट, चित्रपट निर्माते तसेच विविध क्षेत्रांतील शास्त्रज्ञ सहभागी असतील व त्यांच्या ज्ञान कौशल्याचा लाभ विध्यार्थी व पालकांना घेता येईल,असे शास्त्रज्ञ डॉ अरविंद रानडे यांनी व्यक्त केले.

.यावेळी व्यासपीठावर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उपाध्यक्ष प्रवीण रामदास,गोवा विज्ञान परिषदेचे व डीएमसि कॉलेजचे प्रा मनोहर पेडणेकर, हायस्कुलच्या मुख्यध्यपिका स्मिता पार्सेकर,उच्च माध्यमिकचे प्राचार्य राज देसाई,सर्वेश कोरगावकर व प्रवीण रानडे व अन्य उपस्थित होते.स्वागत शारीरिक प्रशिक्षक प्रा सुगंधा शिरोडकर यांनी स्वागत, सूत्रनिवेदन हायस्कुलचे विज्ञान अध्यापक प्रसाद शेटगांवकर तर मुख्यध्यपिका स्मिता पार्सेकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमात हरमल पंचक्रोशी हायस्कूल व हायर सेकंडरी, विद्याप्रसारक हायस्कुल मोरजी,मांद्रे हायस्कूल, मांद्रे,खलप हायस्कूल, मांद्रे,कार्मेल हायस्कुल,हरमल,आयडियल हायस्कूल पालये,भुमिका हायस्कुल, पालये व न्यू इंग्लिश हायस्कुल,केरीच्या विध्यार्थ्यांनी व अध्यापकांनी भाग घेतला होता.दरम्यान हरमलनंतर देवसु प्रज्ञा हायस्कूल,पेडणे भगवती हायस्कुल व अन्य हायस्कुल मध्ये जाण्यास निघाली.

फोटो
हरमल—भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या आयोजनाबद्दलच्या कार्यक्रमात बोलताना हरमल पंचक्रोशी संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर सोबत शास्त्रज्ञ डॉ अरविंद रानडे,डॉ पै,मुख्यध्यपिका

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें