प्रसिद्धी पत्रक
डिसेंबर ०६, २०२१
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दलित समाजाकडून डॉ. आंबोडकरांना श्रद्धांजली
डिचोली ः साळ गावातील दलित समाजाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुष्पांजली वाहिली. डिचोलीतील कॉंग्रेस नेते व सामाजित कार्यकर्ते मेघश्याम राऊत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकरांच्या करुणा व समता या तत्त्वांचे पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
डॉ. आंबेडकर हे दलितांविरुद्धच्या सामाजिक असमानतेविरुद्ध लढलेले राजकारणी तसेच समाजसुधारक होते, असे कॉंग्रेस नेते राऊत म्हणाले. भेदभाव असलेल्या चालीरीतींमधून समाजाला मुक्त करणे हीच मोठी श्रद्धांजली डॉ. आंबेडकरांना असेल, असे मत उपस्थित नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.
अस्पृश्यतेेचे समाजातून निर्दालन करण्यासाठी बाबासाहेब कायम झटले. महिलांच्या उत्थासाठी तसेच समानतेसाठी त्यांनी झुंंज दिली. डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी कॉंग्रेस संघटितपणे सुधारित गोवा व दलित समाजाचे जीवन बदलण्यासाठी कार्य करेल, असे राऊत म्हणाले.
कॉंग्रेस नेते व डिचोलीतील सामाजित कार्यकर्ते
मेघश्याम राऊत
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दलित समाजाकडून डॉ. आंबोडकरांना श्रद्धांजली
.
[ays_slider id=1]