श्री . शांता विद्यालय बार्देश तालुक्यात बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण
विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री शांता विद्यालय केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये नव्हे तर कला संस्कृती व क्रीडा क्षेत्रामध्ये यशाचे शिखर गाठत आहे .क्रीडा व सांस्कृतिक कार्याच्या संचालनालयाने तालुका पातळीवर आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्टरित्या खेळ सादर करून श्री .शांता विद्यालयाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .प्रजीता सांगाळे यांनी विजेत्यांचे तसेच शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक श्री. संगम चोडणकर यांचे अभिनंदन केले.