गोव्याला कोळसा केंद्र बनू देणार नाही. RG

.
गोव्याला कोळसा केंद्र बनू देणार नाही.

रिव्होल्युशनरी गोवन्सने गोव्यात येणाऱ्या कोळषा विरुद्ध पत्रदेवी ते काणकोण पर्यंत पदयात्रा सुरू केली होती. ही पदयात्रा कोरोना वाढ झाल्यामुळे काणकोण मध्ये पूर्ण करायची बाकी राहिले होती. ती रिव्होल्युशनरी गोवन्सने रविवारी पूर्ण केली. यावेळी बोलताना मनोज परब यांनी म्हटले की गोव्याला कोळषाचे केंद्र कदापि बनवून देणार नाही.

शेकडो क्रांतिकारीनी या आरजीच्या कोळषा विरुद्ध चळवळीत सहभाग घेतला. याअगोदर ही ह्या पदयात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेने उपस्थिती लावली होती. परब यांच्यासोबत काणकोणचे गोवा सुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत पागी व इतर उमेदवार आणि समर्थक उपस्थित होते. हाती मशाली आणि मुखातून बाहेर पडणारे घोषणांचे कडेलोट. पूर्ण परिसर गाजत निघाला होता.

मनोज परब यांनी सर्व राजकीय पक्षांवर चांगलाच तीर धरला. भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष, तुलमूल काँग्रेस हे सर्व राजकीय पक्ष्यांचे उमेदवार मात्र तेच आहेत. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे स्वतःचा विकास करून गोव्याला लुटणे हे राजकारण आता गंगेला पोचवण्याची वेळ आली आहे. ज्या उमेदवारांनी एका राजकीय पक्षात असताना गोव्यात येणाऱ्या जनता विरोधी प्रकल्पांना साथ दिली तेच आता पक्ष बदलून आपण तो नवेच असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोवेकरांनी बळीचे बकरे बनू नये अशी विनंती परब यांनी केली. रिव्होल्युशनरी गोवन्स गोवा सुराज पक्षावर सत्तेत आल्यानंतर असे काण कधीही करणार नाही अशी त्यांनी हामी दिली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar