कोवीड व्यवस्थापनाबद्दल कोणी कितीही टिका केली तरी आमचे योग्य तऱ्हेने चालू आहे: विश्वजीत राणे

.
म्हापसा   दि. 7 ( प्रतिनिधी )

        आपण भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार असणार, भाजपाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न असेल. कोणत्याही पक्षाची युती होऊदेत, सर्व युतींना टक्कर देण्यास आम्ही समर्थ आहोत, आपल्या मतदार संघात तरी आपण कोणाचीही डाळ शिजू देणार नाही असा ठाम विश्वास आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केला.
        म्हापसा येथे एका करयक्रमांतर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की युती कोणीही करुदेत शेवटी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होणार आणी पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार सत्तेवर येणार. आम आदमी पाच वर्षांपूर्वी गोव्यात आले आणी नाहीसे झाले, तृणमूल काँग्रेस तशीच येणार आणी जाणार.
      कोवीड व्यवस्थापनाबद्दल कोणी कितीही टिका केली तरी आमचे योग्य तऱ्हेने चालू आहे, सरकारचे कोवीड व्यवस्थापन योग्य दिशेने असून देशातील गोवा हे एकमेव राज्य आहे जेथे एक लाख रुपये प्रत्येक कोवीड रुग्णासाठी दहा- दहा दिवसासाठी खर्च केले जातात. कोवीड काळात टोपीवाल्यांनी दिल्लीच्या लोकांचे काय हाल केलेत ते सर्वश्रुत आहे असा टोला मंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar