वागातोर किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे दगड माती घालून बुझवताना येथील ग्रामस्थ अमोल गोवेकर, मायकल मेंडोन्सा व इतर

.
म्हापसा  दि.7 ( प्रतिनिधी )
       खड्डेमुक्त रस्ते करण्याचे सरकारचे आश्वासन हवेतच विरल्याचे सध्याची गोव्यातील रस्त्यांची स्थिती पाहता आढळून येत आहे. डिसेंबर महिना अर्ध्यावर आला तरी चांगले रस्ते सोडाच पण रस्त्यावरील खड्डे बुझवण्यास सरकारला पर्यायाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाला अपयश आले आहे.
       नाही म्हणायला काही ठिकाणी रस्त्यांच्या फेर डांबरीकरण हॉटमिक्सिंगला सुरवात करण्यात आली होती पण निसर्गाने दगा दिला, पावसाने एनवेळी आपले रौद्र रूप दाखवल्याने फेर डांबरीकरणास व्यत्यय आला.
       हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातील वाहन चालकांना खड्यातून रस्ता शोधावा लागतो. या पंचायत क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीं चालकांचे लहान मोठे अपघात होत आहेत. हणजूण कायसूव पंचायत कार्यालयासमोरून जाणारा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झालेला असूनही सरपंच व इतर पांचसदस्यांना त्याचे काही पडलेले नाही, तसेच वागातोर समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ताही पूर्णपणे उखडलेला असून येथील मोठ्या खड्ड्यात पाणी साचून अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थ योगेश गोवेकर यांनी समाज माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर अमोल गोवेकर व मायकल मेंडोन्सा या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन येथील रस्त्यावरील खड्डे दगड माती टाकून भरून काढले.
      फोटो …….. वागातोर किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे दगड माती घालून बुझवताना येथील ग्रामस्थ अमोल गोवेकर, मायकल मेंडोन्सा व इतर……… ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar