पार्सेकर महाविद्यलयाने,सामाजिक उपक्रमांतंर्गत नागरिक व विध्यार्थ्यांना मधमाशी पालन विषयक मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन

.

हरमल प्रतिनिधी

हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या पार्सेकर महाविद्यलयाने,सामाजिक उपक्रमांतंर्गत नागरिक व विध्यार्थ्यांना मधमाशी पालन विषयक मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन केले होते.त्या कार्यशाळेचे उदघाटन पार्सेकर महाविद्यलायचे प्राचार्य उदेश नाटेकर यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक रविराजन विजय कुमारन, झुलॉजी विभागाचे प्रमुख प्रा कविता नायर व मधमाशी कार्यशाळेचे मार्गदर्शक मेलविन डिसौझा उपस्थित होते.या कार्यशाळेत 20 जणांनी भाग घेतला होता.

पार्सेकर महाविद्यालयाच्या झुलॉजी विभाग प्रयोगशाळेत कार्यक्रम झाला.पार्सेकर महाविद्यालय हे शिक्षक सेवा निर्माण करणारे विद्यालय आहे.बीएस्सी बीएड व बीए बीएड अश्या दोन पदवी शिक्षणाची सोय आहे.महाविद्यालयात शिकणाऱ्या भावी शिक्षकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी ह्या हेतूने संस्था कार्यरत आहे.संस्थेने महिलांसाठी कुकिंग, बेकिंग सारखे रोजगाराभिमुख व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले,त्यातूनच त्यांना स्वयंरोजगार संधी मिळू शकते.कित्येकांनी त्याचा लाभ घेतला असून त्याच पद्धतीचा मधमाशी पालन हा उद्योग आहे.ह्यासाठी खादी व हस्तकला महामंडळ तसेच बँक ऑफ इंडिया आदींनी हा कार्यक्रम पुरस्कृत करून संस्थेला साहाय्य केले त्याबद्दल प्राचार्य उदेश नाटेकर यांनी कौतुक केले.मार्गदर्शक मेलविन डिसौझा हे केंद्रीय कृषी खाते व खादी ग्रामद्योग महामंडळाच्या अनेक कृषीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.शेतकऱ्यांना मधमाशी पालन हा उत्कृष्ट व्यवसाय असून स्वतःच्या जमिनीत घरच्याघरी हा व्यवसाय करता येतो. सरकारचे खादी ग्रामोद्योग महामंडळ शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी 75-90 टक्के अनुदान देत असून,शेतकऱ्यांनी अधिकाधिक फायदा घ्यावा असे डिसौझा यांनी सांगितले. यावेळी त्यानी मधमाश्यांच्या प्रजाती, त्याचा फायदा,उत्पन्न, लागवडीसाठी पूरक हवामान व योग्य पद्धती आदींचे मार्गदर्शन केले.उद्या रविवारी त्यांना म्हापशात मेलविन डिसौझा यांच्या मधमाशी पालन केंद्रात सहभागी  प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल.यावेळी अनेकांच्या  शंकाचे प्रशिक्षक डिसौझा यांनी निरसन केले.प्रारंभी प्राचार्य उदेश नाटेकर यांनी दीपप्रज्वलन केले.प्रा रोशमी शेटकर यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले तर प्रा गायत्री नाईक यांनी,स्वागत, सूत्रनिवेदन व आभार मानले.

फोटो
हरमल—गणपत पार्सेकर महाविद्यालयाने मधमाशी पालन कार्यशाळेच्या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य उदेश नाटेकर सोबत प्रा कविता नायर,रवी कुमारन व मार्गदर्शक मेलविन डिसौझा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar