गोवा मराठी पत्रकार संघातर्फे गौरव

.
गोवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने म्हापसा शहरातील पत्रकार, क्रीडापटू, समाजसेवक, इव्हेन्ट आयोजक अश्या मान्यवर व्यक्तींचा गौरव सोहळा खोर्ली सीम येथील राष्ट्रोळी देवस्थानच्या सभागृहात संपन्न झाला.
       या गौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिताराम सावळ उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून बार्देश तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष तुषार टोपले, बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे, देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय साळगावकर, माजी सैनिक शांताराम रेडकर उपस्थित होते.
        पत्रकार सुदेश आर्लेकर, इव्हेंट आयोजक पंकज हिरवे, क्रीडापटू /गायक विनेश नाईक, समाजसेवक राजेंद्र तेली, राष्ट्रोळी देवस्थानाचे माजी अध्यक्ष निशिकांत साळगावकर यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन मुख्याधिकारी सिताराम सावळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांच्या हस्ते मुख्याधिकारी सिताराम सावळ यांचा सत्कार करण्यात आला.
         गोवा मराठी पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमी दिन, पत्रकारांची सहल, सांस्कृतिक व संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत असते, पण करोना महामारीमुळे यात खंड पडला होता. संघांचे अध्यक्ष गुरुनाथ नाईक यांनी नेहमी सामान्य व्यक्तीचा विचार करून त्यांचा गौरव केला आहे व पुढील वाटचालीला प्रोत्साहन दिले आहे. सत्कारमूर्तीचे अभिनंदन करून त्यांच्या पासून प्रेरणा पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल असे बार्देश पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
         मराठी पत्रकार संघाने आमचा सत्कार करून आम्हाला या करोनाच्या काळात समाजामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, संघाने मराठी चळवळीला उत्तेजन दिले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार संघाला संघटित ठेवले आहे. भविष्यात मराठी पत्रकार संघाचे सदस्य सर्व नवीन पत्रकारांना एकत्र करून संघाची उंची वाढवावी असे मत सत्काराला उत्तर देताना पत्रकार सुदेश आर्लेकर यांनी व्यक्त केले.
       कर्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश तिवरेकर यांनी केले, स्वागत व आभार तुषार टोपले यांनी मानले.
    फोटो….. गोवा मराठी पत्रकार संघातर्फे गौरवण्यात आलेल्या सत्कारमूर्ती सोबत मुख्याधिकारी सिताराम सावळ, संजय साळगावकर सुदेश तिवरेकर, गुरुनाथ नाईक, तुषार टोपले, संजय बर्डे, व शांताराम रेडकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar