सरकारने यंदा सनबर्न संगीत महोत्सवाला परवानगी नाकारल्याने

.
सरकारने यंदा सनबर्न संगीत महोत्सवाला परवानगी नाकारल्याने
या कार्यक्रमादरम्यान धूर, धूळ व ध्वनी प्रदूषणाबरोबरच तीन ते चार दिवस होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडी या पासून सुटकेचा निःश्वास हणजूण – वागातोर वासीय टाकतात तोच आयोजकांनी येथील वादग्रस्त हॉटेल हिलटॉप मध्ये मर्यादित स्वरूपात कार्यक्रम करण्याचे जाहीर करून येथील जनतेला पुन्हा कोंडीत धरले आहे.
          गेली अनेक वर्षे धूर, धूर व ध्वनी प्रदूषणाबरोबरच वाहतुकीची कोंडी करणाऱ्या या सनबर्न संगीत महोत्सवाला मूठभर लोकांच्या फायद्यासाठी सरकारने नाही नाही म्हणत अखेरच्या क्षणी परवानगी देऊन येथील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले होते, कितीही विरोध झाला तरी केंद्रीय दबावांनतर सरकार परवानगी देणार हे गृहीत धरून आयोजक दोन महिने अगोदरच जाहिरात बाजीकरून मोकळे होत होते. कोणतेही परवाने नसताना येथील डोंगरमाथ्यावरील जैवविविधतेचा ऱ्हास करून व भटक्या जनावरांच्या चरावू कुरणावर अतिक्रमण करून एक महिना अगोदर संगीत महोत्सवाची तयारी करीत असत.
     पण गेल्यावर्षी 2020 मध्ये करोना महामारीमुळे हा संगीत महोत्सव न झाल्याने येथील जनता आनंदित होती, यंदाही कदाचित त्याच कारणाने पर्यटन मंत्री शो मस्ट गो ऑन चा नारा लावत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या महिन्यापासून जाहिरात बाजी केलेल्या या संगीत महोत्सवास परवानगी नाकारून स्थानिक सामान्य जनतेस दिलासा दिला.
परवानगी नाकारल्यानंतर आयोजकांनी येथील रेव्ह पार्टी साठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल हिलटॉप शी संधान बांधले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
        संगीत महोत्सव मर्यादित स्वरूपात म्हटला तरी पर्यटकांची व गोमंतकीयकांची अलोट गर्दी लोटणार यात दुमत नाही, कारण सनबर्न या नावातच वलय आहे.करोना महामारीचे अजून समूळ उच्चाटन झालेले नाही, त्यातच करोनाचा नवीन प्रकार ओमीक्रोन भारतात पोहचला आहे आणी संगीत वाजवणारे डीजे वेगवेगळ्या देशातून येतात याची दखल सरकारने व शासकीय यंत्रणेने घ्यावी.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar