म्हापसा येथे ‘कोकण मराठी परिषद, गोवा’ आयोजित १७व्या शेकोटी साहित्य संमेलन

.
इतर थोर लेखकांची शेकडो-हजारो पुस्तके वाचल्यानंतरच स्वत:चे पुस्तककाढण्याचा विचार करावा, असे आवाहन करून, ‘काल पाहिले, आज लिहिले व उद्या प्रकाशित केले, ही घाई कशासाठी’, असा सवाल परभणी येथील साहित्यिक डॉ. प्रा. राजेश गायकवाड यांनी केला आहे.
म्हापसा येथे ‘कोकण मराठी परिषद, गोवा’ आयोजित १७व्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. म्हापसा शहरातील श्री बोडगेश्वर संस्थान, श्री लक्ष्मीनारायण संस्थान व म्हापसा नगरपालिकेच्या सहकार्याने उत्सावर्धक प्रतिसादासह हे संमेलन साजरे झाले.
उद्‍घाटन सत्रावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उद्‍घाटक नांदेडचे साहित्यिक माधव फुलारी-चौधरी, प्रमुख अतिथी नामवंत गोमंतकीय भजन कलाकार मोहनदास पोळे, ‘कोमप’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, स्वागताध्यक्ष म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, संमेलनाच्या कार्याध्यक्ष नगरसेवक डॉ. नूतन बिचोलकर, बोडगेश्वर संस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर, ‘कोमप’च्या कार्यवाह अक्षता किनळेकर, संमेलनाच्या कार्यवाह शुभलक्ष्मी नाईक-गावकर व कोषाध्यक्ष सुदेश तिवरेकर उपस्थित होते. संमेलनाचे कार्यवाह महेश शिरगावकर, आरती टोपले, शीतल साळगावकर, पवन नावेलकर, बुधाजी ऊर्फ प्रशांत रामा नाईक यांनी या वेळी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
संमेलनातील पहिल्या दिवसीचे सर्व कार्यक्रम सायंकाळीपासून रात्री एक वाजेपर्यंत बोडगेश्वर संस्थानच्या दीपस्तंभ परिसरात झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे डॉ. राममनोहर लोहिया उद्यानातील चाफ्याच्या झाडांच्या सान्निध्यात ‘चाफा कविसंमेलन, तर समारोपापर्यंतचे अन्य कार्यक्रम लक्ष्मीनारायण संस्थानच्या सभागृहात अशा तीन ठिकाणी झाले.
नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून साहित्यदिंडीचे उद्‍घाटन झाल्यानंतर हिवरे-सत्तरी येथील श्री सातेरी रवळनाथ दिंडी पथकातर्फे भजनदिंडीचे सादरीकरण झाले. मराठी भाषा चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता रणजित राणे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे, तर ज्येष्ठ शिक्षक श्रीधर नाईक यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
उद्‍घाटन सत्र……….
उद्‍घाटन सत्रांतर्गत मांद्रे येथील श्रीगणेश गटातर्फे संजली नागवेकर यांनी ईशस्तवन, तर नीलेश शिंदे यांनी शेकोटीगीत गायन केले. अमीत भोसले यांनी तबल्याच्या माध्यमातून ‘छत्रपती शिवाजी महाराज स्तुती सादर केली. संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन व ‘को.म.प., गोवा’च्या ‘कल्पलेखणी’ काव्यस्पर्धेचे बक्षीस वितरणही या वेळी झाले. तसेच माधव फुलारी-चौधरी, ममता खानोलकर, मोतीलाल पेडणेकर, सरोजा हळर्णकर, यशवंत परवार व आरती टोपले सहा साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले
गेय कवितांचे सादरीकरण………
उद्घाटन सत्रानंतर अविनाश जाधव यांनी गेय कवितांचे, तर मोरजी येथील श्री ईश्वटी ब्राह्मण महिला मंडळाने फुगडीचे सादरीकरण केले.
निमंत्रितांचे कविसंमेल…….
शंभू भाऊ बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात डॉ. जेनेट बॉर्जिस, गौरी कुलकर्णी, वनिता मयेकर, स्वप्नीला हळर्णकर, शिवानंद  साळगावकर, मुरलीधर बर्डे, उदय वसंत ताम्हणकर, शुभलक्ष्मी नाईक-गावकर, श्रेयसी महालकर, उमेश महालकर, शोभा घोडगे, उदी नार्वेकर, दूर्वा रामचंद्र साळगावकर, शीतल साळगावकर, शिवानंद बाक्रे, संदीप केळकर, ॐकार नाईक, सरोजा हळर्णकर, मोतीलाल पेडणेकर, डॉ. आरती दिनकर, सुरेंद्र शेट्ये, उमेश आगरवाडेकर, सुनिता  शहा, लावंडी गावस, सुभाष शहा, मंदा सुगिरे, अशोक घाडी, अक्षता किनळेकर, प्रज्वलिता गाडगीळ, दीप्ती फळदेसाई यांनी काव्यवाचन केले.
चाफा कविसंमेलन………
दुसऱ्या दिवशी पहाटे डॉ. श्वेता राऊत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. लोहिया उद्यानात झालेल्या चाफा कविसंमेलनात शुभलक्ष्मी  नाईक, दीप्ती फळदेसाई, माधव फुलारी, संदीप केळकर, यशवंत परवार, लावंडी गावास, प्रज्वलिता गाडगीळ, वनिता शिवशंकर मयेकर, डॉ. आरती दिनकर, उमेश आगरवाडेकर, उदय ताम्हणकर, मोहन कदम, अशोक गाडी, शीतल साळगावकर, गौरीश नाईक, श्वेता राऊत, सोनिया शहा, सुभाष शहा, नवसो परब. या संमेलनासाठी ‘शेकोटीची ऊर्जा’ व ‘निसर्गकविता’ असे दोन विषय संमेलनाध्यक्षांनी दिले होते
बौद्धिक सत्रांतर्गत मार्गदर्शन……….
प्रा. सोमनाथ पिळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बौद्धिक सत्रात होणार दीप्ती फळदेसाई (वाचनसंस्कृती आणि आजची युवा पिढी), सरिता झोरो (समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे आणि आजची युवा पिढी) व प्रा. सोमनाथ पिळगावकर (सकारात्मक दृष्टिकोन) यांनी मार्गदर्शन केले
दोन परिसंवाद……..
राजू भि. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जीवनव्यवहारातील सामाजिक भान’ विषयावरील परिसंवादात शुभलक्ष्मी नाईक-गावकर (जीवनव्यवहारातील स्त्रीवाद), डॉ. जेनेट बॉर्जिस (कोविडने माणसाला काय शिकवले?), पूनम बुर्ये (रस्त्यांवरील निराधार बांधवांच्या समस्या) व संगम भौंसुले (राजकारणाचे व्यवसायीकरण) यांनी स्वत:चे विचार मांडले. तसेच, डॉ. प्रा. गीता गावस-येर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘गोमन्तभूमीचे सांस्कृतिक अंत:प्रवाह’ या विषयावरील परिसंवादात डॉ. प्रा. प्रमदा देसाई (विष्णू वाघ यांचे काव्यविश्व), दुर्गाकुमार नावती (गोमंतकीय लोककलेचे स्वरूप), विठ्ठल शेळके (गोव्याची पर्यावरण संस्कृती) व गौरीश नाईक (गोमंतकीय युवकांची सर्जनशीलता) यांनी मतप्रदर्शन केले.
मुक्तांगण, खुले व्यासपीठ…..
‘मुक्तांगण’ कार्यक्रमात डॉ. जेनेट बोर्जिस, सेनोरिटा शेटकर व शोभा घोडगे यांनी काव्यवाचन केले. खुले व्यासपीठ या सत्रात संमेलनातील विचारमंथनाबाबत डॉ. आरती दिनकर यांनी स्वत:ची प्रतिक्रिया व्यक्त केली. या सत्राचे संचालन शुभलक्ष्मी नाईक-गावकर यांनी केले.
समारोप सत्र……….
प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक श्रीधर नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. गायकवाड म्हणाले, की अभिजात साहित्य, अक्षर साहित्य हे चिरकाल टिकणारे असते व ते सत्याला धरून असते. रसिक हा मुका कवीच असतो व कवी बोलका रसिक असतो. समारोपावेळी व्यासपीठावर कोमपचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, संमेलनाचे खजिनदार सुदेश तिवरेकर व कार्यवाह शुभलक्ष्मी नाईक-गावकर उपस्थित होत्या. सुदेश आर्लेकर यांनी अखेरीस आभारप्रकटन केले.
उद्‍घाटन सत्राचे सूत्रनिवेदन अक्षता किनळेकर यांनी, तर समारोप सत्राचे सूत्रनिवेदन शुभलक्ष्मी नाईक-गावकर यांनी केले. या संमेलनास तरुण पिढीतील साहित्यिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता
(चौकट)
विविध क्षेत्रांतील १७ मान्यवरांचा सत्कार
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या पुढीलप्रमाणे सतरा मान्यवरांचा या संमेलनात शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शीतल रामचंद्र साळगावकर (साहित्यिक, वेरे), जयराम अनंत रेडकर (वृत्तपत्रीय लेखक), लाडू विठ्ठल तिरोडकर (भजन व नाट्य कलाकार), संदीप कामूलकर (भजन कलाकार), हर्षा सावंत-वळवईकर (शास्त्रीय संगीत गायिका व नाट्यकलाकार), अमीत प्रतापराव भोसले (तबलावादक), श्यामसुंदर कारेकर (देवस्थान तसेच सामाजिक कार्य), रेश्मा रमेश मठकर (कालोत्सवातील महिला नाट्यकलाकार), योगेश मिराशी (पत्रकार), सौरव शिरोडकर (पत्रकार), नीलेश रमेश वेर्णेकर (अध्यक्ष श्री स्वामी समर्थ मठ, शिवोली), हेमश्री गडेकर (स्वयंसाहाय्य गटांच्या गोव्यातील कार्याच्या प्रवर्तक), आशिष शिरोडकर (अध्यक्ष, म्हापसा व्यापारी संघटना), सुरेखा सूर्यकांत सावंत (सामाजिक कार्य व स्वयंसाहाय्य गटाच्या पदाधिकारी), शीतल सुहास धुरी (सेवानिवृत्त सरकारी परिचारिका), मोहन दाभाळे (सामाजिक कार्यकर्ता), आर्यन गणेश वायंगणकर (फूटबॉलपटू).
……………………
(चौकट)
साहित्य केवळ मनोरंजनाचे साधन नाही : माधव फुरारी
उद्‍घाटन सत्रात बोलताना संमेलनाचे उद्‍घाटक माधव फुलारी म्हणाले, आजच्या मानवी आव्हानांना साहित्यातून चित्रित करावे. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर मानवी कल्याणाचा प्रतिभासंपन्न मार्ग आहे हे लक्षात घ्या. आपला लेखनी तळागाळातील भारतीयांचे दु:ख, वेदना, समस्यांना आविष्कृत करण्यासाठी वापरणे हेच खरे राष्ट्रीयत्व आहे. नव्या पिढीतील साहित्यिकांवर माझा पूर्ण विश्वास आहे, की हे वाङ्‍मयीन नवे सूत्र लक्षात घेऊन ते पुढची वाटचाल करतील.
फोटो……..१ : शेकोटी संमेलनातील साहित्यदिंडी.
२ : शेकोटी साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन करताना नांदेड येथील साहित्यिक माधव फुलारी-चौधरी.
३ : शेकोटी साहित्य संमेलनास लाभलेला प्रतिसाद.
४ : डॉ. लोहिया उद्यानातील चाफ्याच्या झाडांच्या सान्निध्यात डॉ. श्वेता राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘चाफा कविसंमेलना’त कविता सादर करताना शुभलक्ष्मी नाईक-गावकर.
५ : ‘गोव्याची पर्यावरण संस्कृती’ या विषयावर बोलताना विठ्ठल शेळके. बाजूला परिसंवादाच्या अध्यक्ष डॉ. प्रा. गीता गावस-येर्लेकर, डॉ. प्रा. प्रमदा देसाई, दुर्गाकुमार नावती व गौरीश नाईक.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar