हळदोणा मतदारसंघातील म. गो. चे तरूण उमेदवार महेश साटेलकर यांनी घरोघरी संपर्क करायला सुरुवात केली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. महेश साटेलकर यांनी हळदोणा मतदारसंघातील मयडे, नास्नोडा आदी भाग पिंजून काढला असून सर्वसामान्य नागरिकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकंदर हळदोणा मतदारसंघात म. गो विरूद्ध भाजप अशी दुहेरी लढत होणार आहे. तृणमूल काँग्रेसला या भागात एकदम कमी प्रमाणात प्रतीसाद मिळत आहे. किरण कांदोळकर यांनी जरी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी या भागात त्याचा प्रभाव अगदी नगण्य दिसून येतो. त्यांनी जरी भले मोठे फलक लावले तरी त्याचा मतदारांवर काहीच परिणाम होणार नाही अनेकांना तर तृणमूल काँग्रेसबरोबर युती केलानी नाराजी व्यक्त केली आहे. हळदोणा मतदारसंघातून भाजपतर्फे ग्लैंन टिकलो जरी निवडणूकीत उतरले असते तरी त्याचा खरा प्रतिस्पर्धी म.गो.चे महेश साटेलकर हाच असेल. साटेलकर याचे कार्य जर पाहीले तर त्यांनी शेतकरी वर्गासाठी भरीव योगदान दिले आहे. त्याचा जनसंपर्क दांडगा असून तेच भाजप च्या उमेदवारास खरी टक्कर देणार आहेत
. तूर्त तरी म गो उमेदवार महेश साटेलकर पुढे असून आगामी दिवसात चित्र स्पष्ट होईल. महेश साटेलकर यांच्या बरोबर त्याचे काका रामा साटेलकर हेही त्यांच्या प्रचार कार्यात सहभागी होत आहेत
काँगेस चा या मतदारसंघ उमेदवार निश्चित ठरला नसल्यामुळे सध्या काँग्रेस गटात सामसूम दिसून येत आहे.