आसगाव, बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नॅक संस्थे कडून ‘ अ ‘ श्रेणी देण्यात आली असून ही श्रेणी मिळवणारे हे गोव्यातील पहिले महाविद्यालय

.

म्हापसा  दि. 15 (प्रतिनिधी )

      आसगाव, बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नॅक संस्थे कडून ‘ अ ‘ श्रेणी देण्यात आली असून ही श्रेणी मिळवणारे हे गोव्यातील पहिले महाविद्यालय ठरल्याची माहिती या महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे प्राचार्य डॉ. डी. बी. आरोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये घेतलेल्या या पत्रकार परिषदेला उपप्राचार्य रश्मी रेडकर, मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे, व समनव्यक जिवन खेडेकर उपस्थित होते.
        राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक), बेंगलोर या संस्थेच्या पीअर टीमने 1 व 2 डिसेंबर 2021 रोजी या महाविद्यालयास भेट देऊन पहाणी केली, आणि विविध घटकांशी वार्तालाप केला, संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाच्या नवनिर्मितीसाठी एक परिपूर्ण परिसंस्था निर्माण केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. त्यांच्या मूल्यकांनात महाविद्यालयाला 4 पैकी 3.15 गुण मिळाले. मूल्यकांनाच्या 4थ्या चक्रासाठी मूल्यांकन केलेल्या गोव्यातील महाविद्यालयामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे पहिले महाविद्यालय ठरले आहे. भारतात आतापर्यत केवळ 64 महाविद्यालयांना 4 थ्या चक्रात मान्यता मिळाली आहे, आणि ज्ञानप्रसारक मंडळाचे महाविद्यालय आणि संशोधन केंद्र आता राष्ट्रीय स्तरावर 9 व्या क्रमांकावर आहे. भारतात सुमारे 40 हजार महाविद्यालये आहेत अशी माहिती डॉ. आरोलकर यांनी दिली.
       या महाविद्यालयातून गेल्या 5 वर्षात 43 टक्के विध्यार्थी एकतर थेट कॅम्पस भरतीद्वारे नोकरीं करीत आहेत तर काहीजण उच्च शिक्षण घेत आहेत आणि 14 जणांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. 80 हजार चौ. मी. जागेत येथे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना त्यांचे व्यक्तीमत्व विकसित करण्यासाठी आधुनिक उपकरनासह सुसज्ज प्रयोग शाळा, प्रशस्त जिमखाना, तसेच सौरऊर्जा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असे डॉ. आरोलकर यांनी सांगितले.
       या महाविद्यालयात 1900 विध्यार्थी सध्या शिक्षण घेत असून येथे मिळणाऱ्या दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाचा त्यांना अभिमान असल्याचे सांगतात असे समनव्यक जिवन खेडेकर यांनी सांगितले.
फोटो…… आसगाव बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्राचार्य डॉ. डी. बी. आरोलकर, सोबत उपप्राचार्य रश्मी रेडकर, मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे व जिवन खेडेकर…….. (

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar