कचरा वर्गीकरण शेडचे उदघाटन

.

पंचायत क्षेत्रासाठी वर्गीकरण शेड नसल्याच्या कारणास्तव पंचायत संचालनायाच्या माननीय हायकोर्टाने पंचायतीवर घातलेल्या निर्बंधामळे शेवटी एकदाचे हरमल पंचायतीने पावले उचलून कचरा वर्गीकरण शेडची उभारणी केली.कालच सरपंच मनोहर केरकर यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.

ह्या शेडच्या उदघाटनास उपसरपंच बर्नार्ड फेर्नांडिस, पंच अनंत गडेकर, मनीषा कोरकणकर,इनासियो डिसौझा,पंचायत सचिव दशरथ परब,कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदर्श नाईक,
पंचायत कर्मचारी प्रमोद गावडे,गणपत नाईक,प्रितेश परसाई व अन्य उपस्थित होते. पंचायत क्षेत्रातील सर्व पातळीवर गांवाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जातात व त्यादृष्टीने मंडळ कार्यरत आहे.सध्या जमीन मिळणे कठीण होते, मात्र पंचायतीची निकड पाहून जमीनदार राजन गावडे यानी करार पध्दतीने स्मशानभूमीनजीक जमीन दिल्याचे सरपंच मनोहर केरकर यांनी सांगितले.गावातील व्यावसायिकांनी कचऱ्याची सार्वजनिक ठिकाणी विल्हेवाट न लावता,पंचायतीने कंत्राटदार नेमला असून दर दिवशी त्यांची गाडी कचरा गोळा करीत असते व्यावसायिकांनी कचरा गाडीकडे द्यावा व स्वच्छतेस सहकार्य करावे असे आवाहन उपसरपंच बर्नार्ड फेर्नांडिस यांनी केले.गावाच्या स्वछतेसाठी पंचायत 14-15 लाख रुपये खर्च करीत असून व्यावसायिकांनी प्लास्टिक कचरा न जाळता, तो कचरा द्यावा व प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच कचरा शुल्क भरून पावती घ्यावी असे आवाहन कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदर्श नाईक यांनी केले.शेवटी सचिव दशरथ परब यांनी आभार मानले.

फोटो
हरमल—-कचरा वर्गीकरण शेडचे उदघाटन करताना सरपंच मनोहर केरकर सोबत उपसरपंच बर्नार्ड फेर्नांडिस, मनीषा कोरकणकर,अनंत गडेकर,इनासियो डिसौझा,पंचायत सचिव दशरथ परब,कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदर्श नाईक व अन्य

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar