पंचायत क्षेत्रांत खालचावाडा,गिरकरवाडा तसेच मधलावाडा भागांतील नागरिक व गृहिणींना प्रखर पाणी टंचाई

.

येथील पंचायत क्षेत्रांत खालचावाडा,गिरकरवाडा तसेच मधलावाडा भागांतील नागरिक व गृहिणींना प्रखर पाणी टंचाई जाणवत असल्याचा संताप नागरिकांनी ग्राम विकास समितीच्या बैठकीत व्यक्त केला व उपस्थित पेडणे पाणी पुरवठा खात्याचे मुख्य अभियंता वॉलसन याना निरुत्तर केले.

दरम्यान, हरमल भागात काम करणारा ‘एक’ कर्मचारी नेहमीच गैरहजर व जाणूनबुजून हलगर्जीपणा करीत असल्याने, त्याची त्वरित बदली करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली व अभियंता वॉलसन यांनी मागणी मान्य केली आहे.

ह्या पंचायत क्षेत्रांत पाणी टंचाईचे मूळ कारण अद्यापि खात्याच्या अभियंत्यांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले.मात्र चांदेल प्रकल्पातून पाणी अनियमित व तुटपुंजे येत असल्याने, मोपा व अन्य भागांना दिला जाणारा पाणीपुरवठा दिवसाआड वळवून हरमल भागांत वळता करावा अशी मागणी माजी पंच दिलीप वस्त यांनी केली.आम्ही नागरिकांनी बंदचा इशारा देताच,पाणी पुरवठा सुरळीत कसा होतो,असा सवाल चंद्रहास दाभोलकर यांनी विचारला व निरुत्तर केले.
पेट्रोलपंप परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यास महिना उलटला,अद्यापही दुरुस्ती का झाली नाही,असे विचारताच रस्ता खोदण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचे वॉलसन यांनी सांगितले. त्यावेळी नागरिकांनी आक्षेप घेतला,व प्राधान्याने कामे दुरुस्त होत नसल्यास तुमची गरज काय,पंचायतीला विश्वासात घेऊन रस्त्याचे खोदकाम करण्याची मागणी नागरिक व कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदर्श नाईक यांनी केली.

पाणीच नसल्याने बूस्टर पंप कुचकामी—-
खालचा व गिरकरवाडा भागांत पाणी टंचाईचे मूळ कारण बूस्टर पंप असल्याचे वॉलसन यांनी सांगितले. त्यावेळेस नागरिकांनी पाणी कमी येत असल्याने नागरिक पंप लावून मिळेल तेवढ्या पाण्यावर समाधान मानतात,असे पंच प्रवीण वायंगणकर यांनी सांगितले.त्यावेळेस पंप तुम्ही हुडकून काढा व त्याहीपेक्षा पाणी पुरवठा मुबलक करा,असे वायंगणकर यांनी सांगितले.

टँकरद्वारे पाणी पुरवठा,अनियमितता,संताप—
खालचावाडा व अन्य भागांत टॅंकरद्वारे होणारा पाणी पुरवठा अनियमित असून त्याचा पाणी पुरवठा अवघ्याच लोकांना का दिला जातो,असा सवाल माजी पंच दिलीप वस्त यांनी केला.टँकरची नोंद खात्याकडे नसल्यास पाणी पुरवठा का करता,असा सवाल केला.त्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता ठाकूर यांच्याकडे असल्याने त्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन अभियंता वॉलसन यांनी दिली.

तुये 30 एमएलडी प्रकल्पाची तहान भागवा—
मांद्रे मतदारसंघासाठी 30 एमएलडी पाणी प्रकल्प एक मृगजळ बनले आहे.तो प्रकल्प पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल माहिती नाही,परंतु कुठे अडकला असेल तिथली तहान भागवा,अशी विनंती नागरिकांनी केली.पंचायतीने अनेकदा ठराव समंत केला आहे.मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी तत्परता दाखवीत मागणी केली आहे.मात्र शासकीय अडकीत्यात अडकलेली फाईल नेमकी कुठे असेल,ह्याचा थांगपत्ता अभियंता वॉलसन याना नसल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

तरी अवघ्या महिनाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते अशी शक्यता आहे.सध्या लोक पाण्यासाठी तहानलेले असून जितक्या लवकर पुरवठा सुरळीत होईल,तितके मतदार पाठीशी राहतील,ह्यासाठी लोकांची तहान भागवा अशी मागणी होत आहे.

फोटो
हरमल—-हरमल ग्राम विकास समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा खात्याचे अभियंते वॉलसन याना जाब विचारताना आदर्श नाईक,दिलीप वस्त तसेच सरपंच मनोहर केरकर, व्हिडिसी निमंत्रक तथा पत्रकार चंद्रहास दाभोलकर, उपसरपंच बर्नार्ड फेर्नांडिस,पंच अनंत गडेकर, मनीषा कोरकणकर, प्रतीक्षा नाईक,इनासियो डिसौझा, गुणाजी ठाकूर,प्रवीण वायंगणकर  व अन्य

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar