जुनसवाडा मांद्रे येथील श्री औदुंबर पंचायत दत्तात्रय मठ मंदिर प्रतिष्ठान सातोस्करवाडातर्फे 14 वी दत्तजयंती सोहळा शनिवारी 18 रोजी श्री औदुंबर मठाचे मठाधिपती प.पू.माणिकनाथ स्वामींच्या मार्गदर्शनाखाली साजरी होणार आहे.
यादिनी शनिवार 18 रोजी पहाटे 5 वाजता भूपाळ्या व काकड आरती सेवार्पण शरद लवू पार्सेकर सकाळी 10 वाजता श्रीपादुका दुग्धभिषेक,जलाभिषेक,सहस्त्रनाम महापुजा,महागणपती पूजन,एकूण धार्मिक विधी व आरती पुरोहित वे मु श्री बाळकृष्ण जोशी यजमान सौ व श्री अभिजित काशीनाथ धुरी, सातोसे,दुपारी 1 वाजता महाप्रसाद,संध्याकाळी 4 ते 5 दत्तजन्म पाळणा संध्याकाळी 6.30 वाजता दत्तजन्म आधारित प्रवचन व आशिर्वाचन प पू मठाधिपती माणिकनाथ स्वामी,संध्याकाळी 7.30 वाजता गायक अर्जुन नाईक यांचे सुश्राव्य गायन,साथसंगत साहिल नारूळकर (हार्मोनियम)सतीश नाईक (तबला)व मंजिरी सात्विक नाईक यांची आहे.रात्री 930 वाजता महाआरती,तिर्थप्रसाद व महाप्रसाद होईल.कोविड नियमांचे पालन करून यंदाचा उत्सव 1 दिवसांचा करण्याचे निश्चित केले आहे.तरी भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृपेस पात्र व्हावे असे आवाहन देवस्थान कार्यकारी समितिने केले आहे.