कुचेली,  म्हापसा येथे बायो मिथिनेशन प्रकल्पाचे उदघाट्न

.
सरकारकडून छतावरील सौर ऊर्जानिर्मितीला मोठे महत्त्व देण्यात येत असून या प्रणालीचा उपयोग करणार्‍यांना सरकार ५० टक्के अनुदान देते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी या पर्यायी वीजनिर्मितीकडे वळावे, असे आवाहन पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी केले.
   म्हापसा पालिकेच्या कुचेलीतील विकेंद्रित ५ टीपीडी बायो मिथेनेशन प्रकल्पांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.  यावेळी नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, मुख्याधिकारी सीताराम सावळ, नगरसेवक सुशांत हरमलकर, स्वप्नील शिरोडकर, प्रिया मिशाळ, केयल ब्रांगाझा, किशोरी कोरगांवकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, अभियंता हुसैन शहा मुझावर हे व्यासपीठावर हजर होते.
म्हापसा शहरातील घनकचर्‍याच्या व्यवस्थापनाला उत्तर म्हणून हा प्रकल्प लाभदायक ठरेल व या प्रकल्पामधून वीज निर्मिती होणार आहे, असे सांगून
मंत्री नीलेश काब्राल म्हणाले की, सध्या देशासह जगाला वातावरणीय बदलाची चिंता भेडसावत आहे. अशावेळी लोकांनी सुद्धा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार लावत पर्यायी सौरऊर्जासारख्या प्रकल्पांना प्राधान्य द्यावे. शिवाय म्हापसा पालिकेने या कुचेली येथील बायो मिथेनेश प्रक्लपाच्या शेडवर सोलर पॅनेल बसवून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
      या प्रकल्पाविषयी माहिती देताना अभियंते गौरव पोकळे म्हणाले की, हा विकेंद्रित प्रकल्प असून दिवसाला ५ टन कचर्‍यावर याठिकाणी वर्गीकरणासोबत प्रक्रिया होईल. इथे ओला, सुका व वैद्यकीय या कचर्‍याचे वर्गीकरण होईल. शिवाय म्हापसा पालिकेने २० प्रभागांचे विभाजन करून तीन झोनमध्ये त्याची विभागणी केली आहे. जेणेकरून कचरा व्यवस्थापनात सुसूत्रता यावी.
               पोकळे म्हणाले की, सध्या पालिकेने सहा सोसायटीच्या इमारतींकडे करार करून तेथील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार. ज्याठिकाणी दिवसा २५ किलोपेक्षा जास्त कचरा निर्मिती होतो, अशा जागी पालिका आर्थिक मदत पुरविणार आणि त्यानंतर सोसायटीला तो स्वतः ऑपरेट करावा लागेल. या संकल्पनेद्वारे कचर्‍यावर जागच्या जागी प्रक्रिया करता येईल. शिवाय पालिकेवरील भार कमी होईल व मनुष्यबळची गरज भासणार नाही. याच धर्तीवर म्हापसा यार्डमध्ये अशाचप्रकारे सुविधा उभी करण्यास पालिका विचारधीन आहे. हा कुचेलीतील प्रकल्प कार्यक्षम असून याद्वारे वीजनिर्मिती होईल, जी प्रकल्पाला पुरवेल तसेच उर्वरित ग्रीडला पाठविली जाईल, असेही पोकळे यांनी नमूद केले.
      या प्रकल्पच्या उभारणीसाठी 6.77 करोड खर्च करण्यात आले असून पुढील काळात या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे,  येत्या काळात असाच प्रकल्प म्हापसा बाजारात उभारण्यात येणार असल्याचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी सांगितले. तर पालिका क्षेत्रात दिवसाला 24 टन कचरा गोळा केला जातो, नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता वर्गिकरण करून द्यावा आणी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी या वेळी केले.
फोटो….. कुचेली,  म्हापसा येथे बायो मिथिनेशन प्रकल्पाचे उदघाट्न करताना वीजमंत्री निलेश काब्राल, सोबत आमदार जोशुआ डिसोझा, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर व इतर नगरसेवक….. ( रमेश नाईक )
.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar