सरकारी नोकरीसाठी लेखी परीक्षा देणाऱ्या एकाच उमेदवारास दोन वेगवेगळ्या आसन क्रमांकाचे दोन वेगळे कॉल लेटर्स पाठवण्याचा पराक्रम पंचायत संचालनालयाने केला

.
म्हापसा  दि. 17  ( प्रतिनिधी )

      सरकारी नोकरीसाठी लेखी परीक्षा देणाऱ्या एकाच उमेदवारास दोन वेगवेगळ्या आसन क्रमांकाचे दोन वेगळे कॉल लेटर्स पाठवण्याचा पराक्रम पंचायत संचालनालयाने केला आहे.
          मिळालेल्या माहिती नुसार हणजूण येथील एका युवतीने पंचायत सचिव पदाकरिता अर्ज केला होता, या पदाकरिता दि.20 डिसें.2021 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या करिता पंचायत संचालनालयाने उपसंचालक दिनेश पवार यांच्या सहीने उमेदवारांना लेखी परीक्षेचे कॉल लेटर्स पाठवले. हणजूण येथील या उमेदवाराला दोन आसन क्रमांकाचे दोन कॉल लेटर्स पाठवले. दोन्ही कॉल लेटर्स मध्ये फक्त परीक्षेचे ठिकाण मात्र समान आहे. दोन कॉल लेटर्स मिळाल्याने त्या उमेदवाराचा गोंधळ उडाला असून कोणत्याही एका आसन क्रमांकावरून परीक्षा दिल्यास दुसऱ्या आसन क्रमांकावर गैरहजर असल्याचा शेरा लागेल अश्या द्विधा मनस्थितीत उमेदवार आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar