हणजूण कायसूव पंचायतीने सांस्कृतिक व सामाजिक कार्य राबवण्यात अनास्था दाखवली

.

म्हापसा दि. 17  ( प्रतिनिधी )

         गोवा मुक्तीदिनाच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त राज्य सरकारने प्रत्येक पंचायतीला तीन लाख दिले होते. त्यात बांधकाम करण्यास मनाई होती. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले होते.काही पंचायतीनी या निधीचा चांगला उपयोग केला पण हणजूण कायसूव पंचायतीला या निधीबद्दल काही माहीतच नाही.
       उत्पन्नाच्या बाबतीत उत्तर गोव्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हणजूण कायसूव या पंचायतीला असा कोणता निधी सरकारने दिला याची सुताराम कल्पनाच नसल्याचे या पंचायतीचे सरपंच व सचिवाकडून मिळालेल्या माहितीवरून कळते. गोवा मुक्ती दिनाच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त गोवा राज्य सरकारने दिलेला तीन लाखाचा निधी पंचायतीने सामाजिक किंवा सांस्कृतिक उपक्रम राबवण्यास न राबवल्याने तसाच पडून राहिला, एरव्ही विकासकामाबाबत मागासलेल्या या पंचायतीने या निधीचा वापर ग्रामस्थांकरिता सांस्कृतिक व सामाजिक राबवण्यात अनास्था दाखवली
         असा कोणता निधी पंचायतीला पाठवण्यात आल्याचे माहित नाही,  बँकेचे अकाऊंट चेक करून पाहतो असे उत्तर हणजूण कायसूव पंचायतीचे सचिव धर्मेंद्र गोवेकर यांनी या बद्दल विचारले असता सांगितले  जर हा निधी या उपक्रमासाठी वापरला नाही तर निधी 19 डिसें. ला सरकारकडे परत जाणार आहे असे सांगितले असता आता काय करणार असा सवाल सचिवाने केला.
          राज्य सरकारने पंचायतीला तीन लाख दिले याबद्दल आपण अनभीज्ञ् आहे, पंचायत सचिवला या बद्दल माहिती आहे का विचारावे लागेल असे सरपंच सावियो अल्मेदा यांनी विचारले असता सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar