स्व. मनोहर पर्रीकर यांचा पुतळा साकारताना चित्रकार संजय हरमलकर

.

म्हापसा  दि. 18  ( प्रतिनिधी )

       आपल्यातील क्षमता पारखण्यासाठी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा पुतळा तयार करणारे गोव्यातील नामवंत चित्रकार संजय हरमलकर यांना नुकताच गोवा राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार देण्यात आला त्या निमित्ताने…
        गोवा कला महाविद्यालयाची पदवी घेतलेले तिनमाड, सडये-शिवोली येथील संजय हरमलकर यांनी राजकारण करता करता चित्रकला जोपासली एवढेच नव्हे तर चित्रकलेबरोबरच शिल्पकला व मूर्तीकलाही वाढवली. त्यांनी काढलेल्या तैलचित्रांची गोव्यात तसेच गोव्याबाहेरही अनेक प्रदर्शने झाली, काही प्रदर्शनाची उदघाटने स्व. पर्रीकर यांनी स्वतः केली होती. त्यांनी काढलेली तैलचित्रे गोव्याच्या विधानभवनात लावण्यात आली आहेत, गोवा पोलीस बऱ्याचदा त्यांची मदत घेतात त्या मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिटयूट, पणजी चे माजी अध्यक्ष संजय हरमलकर यांच्याशी केलेली बातचीत…
       *  स्व. मनोहर पर्रीकर यांचा पुतळा निर्मिती करावी असे का वाटले ?
      =  स्व. मनोहर पर्रीकर हे आपल्या आवडत्या व्यक्ती पैकी एक होते. आमची चांगली मैत्री होती, मुख्यमंत्री असताना त्यांनी गोव्याचा चांगला विकास केला.त्यांच्या मुळेच आपण भाजपात गेलो, शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर आपण राजकारणापासून लांब गेलो होतो, पण पर्रीकरांनी परत आपणाला राजकारणात आणले. कोणत्याही माणसाला आपलेसे करण्याचा व मोठेपणाचा बडेजाव कधी न करण्याचा हा त्यांचा गुण मला आवडला म्हणून त्यांचा पुतळा करण्याचा व आपली क्षमता पाहण्याकरिता प्रयत्न केला तो कितपत यशस्वी झाला ते लोकांनी ठरवावे. मातीचे काम करण्याचे लहानपणी वडिलांकडून शिकलो. पहिल्यांदा परशुरामची मूर्ती केली, त्यानंतर काही मुर्त्या केल्या. इतरांसाठी अनेक मुर्त्या व पेंटिंग्स केली पण हे काम स्वतःसाठी केले.
चेहऱ्याचे काम करण्यासाठी एक महिना लागला, संपूर्ण पुतळा दोन महिन्यात तयार झाला.
        आतापर्यत आपण गोव्यातील नामवंत अश्या 50 व्यक्तीमत्वाची त्यांची ओळख गोमंतकीय जनतेला व इतरांना असावी म्हणून तैलचित्रे काढलीत, व ती इन्स्टिटयूट मेनेझीस ब्रागांझा कडे सुपूर्द केलीत. या कले बरोबरच आपणाला गायनचाही छंद आहे.
     फोटो………1) स्व. मनोहर पर्रीकर यांचा पुतळा साकारताना चित्रकार संजय हरमलकर   2)  सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्याकडून राज्यशासनाचा सांस्कृतिक पुरस्कार स्वीकारताना संजय हरमलकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar