दांडो, हणजूण येथील समुद्रकीनाऱ्यालगत असलेल्या सहा गाळेवजा दुकानांना पहाटे आग लागून सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले.

.

म्हापसा  दि.18  ( प्रतिनिधी )

        दांडो, हणजूण येथील समुद्रकीनाऱ्यालगत असलेल्या सहा गाळेवजा दुकानांना पहाटे आग लागून सुमारे नऊ लाखांचे नुकसान झाले.
         मिळालेल्या माहिती नुसार या ठिकाणी तात्पुरती व काही अंशी पक्की बांधकामे केलेली लहान लहान दुकाने आहेत. यापैकी लॉरेंस कार्व्हालो, आलेक्स रॉड्रिग्ज, व जॉनी नवानेटो यांची प्रत्येकी दोन दुकाने अगीच्या भक्षस्थानी पडली. ही दुकाने त्यांनी बिगर गोमंतकीयकांना भाड्याने दिली होती. त्यात ते रेडिमेड कपडे, गॉगल्स व इतर सामानाची विक्री करीत होते.
म्हापसा अग्निशामक दलास या आगीची खबर पहाटे 2.25 ला मिळाली, अग्निशामक दलाचे सलीम शेख, गोविंद देसाई, गिरीष गावस, अमोल सातर्डेकर, रिचर्ड त्रिनिदाद या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली पण अग्निशामक दलाची गाडी योग्य रस्ता नसल्याने त्या ठिकाणी नेण्यास असमर्थ ठरले, शेवटी त्यांनी समुद्राच्या पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत सहा दुकाने जळून पूर्ण खाक झाली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसून पुढील तपास हणजूण पोलीस करीत आहेत.
    फोटो…. हणजूण येथे अगीच्या भक्षस्थानी पडलेल दुकान

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें