म्हापसा दि. 18 ( प्रतिनिधी )
हणजूण पोलिसांनी अंमलीपदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत एका नायजेरियन नागरिकास अटक करून त्यांच्याकडून 351600/- रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला. गेल्या पाच दिवसात नायजेरियन नागरिकास अटक करून अंमली पदार्थ जप्त करण्याची हणजूण पोलिसांची ही दुसरी कारवाई. ही कारवाई दि.18 रोजी सायंकाळी 3 च्या दरम्यान करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार भाटी-ओशेल, शिवोली येथे अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर यांनी हवालदार श्यामसुंदर पार्सेकर, पोलीस शिपाई राजेश गोरखनकर, अजिंक्य गोगले, सत्तेन्द्र नस्नोडकर, रितेश मांद्रेकर, रुद्रेश विर्डीकर यांच्यासोबत सापळा रचला असता लकेच्छुकऊ सी. Ezlashi (35) रा. भाटी ओशेल, शिवोली हा नायजेरियन नागरिक भाटी ओशेल येथील रस्त्यावर संशयितरित्या घुटमळताना आढळला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचेकडे कोकेन हा रु.351600/- किंमतीचा अंमली पदार्थ सापडला. हणजूण पोलिसांनी त्याच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करून अटक केली असून निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर पुढील तपास करीत आहेत.
फोटो ……… अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांसोबत हणजूण पोलीस उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर व इतर पोलीस सहकारी…….. ( रमेश नाईक )