श्री शांता विद्यालयामध्ये गोवा मुक्ती दिन कार्यक्रम उत्साहात

.

श्री शांता विद्यालयामध्ये गोवा मुक्ती दिन कार्यक्रम उत्साहात

विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री.शांता विद्यालयामध्ये गोवा मुक्ती
दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिवशंकर मयेकर, त्यांच्या सौभाग्यवती सौ. वनिता मयेकर उपस्थित होते. तसेच शाळेचे व्यवस्थापक श्री. शिवाजी पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .प्रजिता सांगाळे, माजी मुख्याध्यापक श्री. शशिकांत नाईक, पालक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष श्री. मंगेश कासकर, कु.सुहानी मयेकर, उपस्थित होते त्याचप्रमाणे शिक्षक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थीगण यावेळी हजर होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली.मुख्याध्यापिका सौ.प्रजीता सांगाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व त्यांच्या कार्यकृर्त्यांचा परिचय करून दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर केले.
प्रमुख पाहुणे श्री शिवशंकर मयेकर आपल्या भाषणात म्हणाले की ज्याप्रमाणे गोव्यातील व भारताच्या वीरांनी जिद्दीने व निष्ठेने देशासाठी कार्य केले‌ व आपल्या गोवा मुक्त होण्यासाठी जे हौतात्म्य पत्करले तसेच आपणही त्याच प्रकारची जिद्द बाळगून देशाला व आपल्या मातृभूमीला प्रगतीपथावर नेण्यास सदैव प्रयत्नशील राहूया

गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.
विद्यार्थिनी कु. आफ्रिन शहा, कु.शकुंतला शेळके, कु.आसिया नदाफ, यांनी गोवा मुक्तिसंग्रामाची गौरवगाथा हिंदी ,मराठी, इंग्रजी या भाषातून सांगितले.
तसेच गोवा मुक्ती संग्राम उत्तम रित्या विद्यार्थ्यांनी नाट्य रूपात प्रस्तुत केला. देखणी हे एक गोव्यातील प्रसिध्दलोकनृत्य विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सादर करून गोव्याचा सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले. व्यवस्थापक श्री.शिवाजी पाटील यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar