कचरा कुंड्या पाडून कचऱ्यावर ताव मारणारी भटकी गुरे. 

.
म्हापसा दि.20  ( प्रतिनिधी )
           हणजूण कायसुव पंचायत क्षेत्रात भटक्या गुरांनी ( जनावरे ) उच्छाद मांडला असून त्यांचा त्रास स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही होत आहे.
        भटकी जनावरे ( गुरे ) ही डोके दुखी झालेली असून ती रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाहन चालकांना त्याचा खूप त्रास होतो,  या भटक्या गुरांमुळे रात्रीच्या वेळी लहान मोठे अपघात होत असतात. हणजूण कायसुव पंचायतीने पंधरा वर्षा पूर्वी पंचायतीच्या मागच्या बाजूला भटकी गुरे पकडून ठेवण्यासाठी कोंडवाडा बांधला होता.( जो आता कचरा गोळा करणारे कर्मचारी राहण्यासाठी वापर करतात ) बरीच वर्षे तो तसाच विनावापर पडून होता. गुरांना पकडण्यासाठी ‘ बुल अटेंडंट ‘ मिळत नसल्याचे कारण ग्रामसभांमधून ग्रामस्थांना सांगितले जात होते, परंतु या भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी हणजूण कायसुव पंचायतीने अद्याप कोणतीही उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केला नाही. या भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी गोशाळेशी करार करावा अशी सूचनाही काही ग्रामस्थांनी ग्रामसभांमधून केली होती.अनेकवेळा मागणी केल्यानंतर पंचायतीने नोव्हेंबर 2019 मध्ये सिकेरी मये येथील गोमंतक गोसेवक महासंघ यांच्या कडे पत्रव्यवहार करून एमओयू करण्यासंबधी विचारणा केली पण त्यानंतर कोणताही पाठपुरावा केला नाही.
        या भटक्या गुरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठी पंचायतीने पुढाकार घ्यावा अशी नागरिकांची व पर्यटकांची मागणी आहे
       फोटो……. कचरा कुंड्या पाडून कचऱ्यावर ताव मारणारी भटकी गुरे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar